जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
बुधवार दिनांक २४ जानेवारी रोजी कुसूर येथील भक्तिधाम मंदिरात डिसेंट फाउंडेशन व कुसुर ग्रामस्थ यांच्यावतीने आर झुंणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २३२ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून,तीस रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आर झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले.शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होणार असून रुग्णांना प्रवास,निवास व जेवण मोफत दिले जाणार आहे.तसेच एक महिन्याची औषधे देखील मोफत दिली जाणार आहेत.जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारा असल्याचे मत डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके,गुलाब पारखे, हॉस्पिटलचे प्रतिनिधी प्रकाश पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश ताजणे,माजी पंचायत समिती सदस्य संतोष वाघ,दिलीप गांजळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे,डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण,जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे,पांडुरंग मोढवे, नलावडे गुरुजी,संजय परदेशी, कुसूरचे सरपंच दत्तात्रय ताजने,माजी सरपंच सदाशिव ताजणे,तानाजी दुराफे,समीर हुंडारे,अरुण पारखे, शिवाई देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक विकास दराफे,उपाध्यक्ष राजेंद्र भगत,पोलीस पाटील ऋषिकेश ताजने, गणेश मेहर,सत्यवान खंडागळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी आदित्य दुराफे,मयूर दुराफे,किशोर भालेकर,किशोर वऱ्हाडी,विनायक दुराफे,अक्षय दुराफे,प्रसाद ताजने,रमेश काळे, सत्यवान दुराफे यांनी प्रयत्न केले.