प्रतिनिधी : मारुती पळसकर.


शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या मुंजाळवाडी साठी असलेल्या बापूसाहेब गावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी साहेबराव भाऊसाहेब कांदळकर यांची तर उपाध्यक्षपदी देविदास किठे यांची दि.२४ रोजी बिनविरोध निवड झाली.
बापूसाहेब गावडे सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष पांडूरंग मुंजाळ व उपाध्यक्ष सोपानराव देवकर यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर सदर पदांच्या जागी निवडणूक प्रक्रिया पार पडली.या जागेसाठी कांदळकर आणि किठे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

सहाय्यक सहकारी संस्थेचे मुख्य लिपीक अप्पासाहेब धायगुडे,सोसायटीचे सचिव अर्जून शिंदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.नव निर्वाचित अध्यक्ष कांदळकर व उपाध्यक्ष किठे यांचे सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे,जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, जेष्ठ व्यक्तीमत्व चांदाशेठ गावडे,माजी पंचायत समिती सदस्य सुदामभाऊ इचके,सरपंच सुनिता पोकळे,उपसरपंच उत्तम जाधव,उद्योजक बाळासाहेब डांगे,माजी चेअरमन बबनराव पोकळे,माजी सरपंच दिपकभाऊ रत्नपारखी,बबनराव पोकळे,अरुणभाऊ मुंजाळ,माजी उपसरपंच अंकुश शिंदे,बाजीराव उघडे समस्थ ग्रामस्थ कवठे येमाई यांनी अभिनंदन केले.


यावेळी संचालक मंडळ पांडूरंग मुंजाळ,सोपानराव देवकर,अंकुश उघडे,भाऊ मुंजाळ,समिंद्राबाई मुंजाळ , दिनकर घोडे,भाऊ घोडे,डॉ.हेमंत पवार,मारुती हिलाळ,देविदास हिलाळ,विठाबाई मुंजाळ,लहू येडे,विद्याताई हिलाळ,कैलास बच्चे,दत्तात्रय पडवळ,विकास अधिकारी राजेंद्र चाटे,सखाराम मुंजाळ,रामदास सांडभोर,रामदास माळवदे, जानकू मुंजाळ,बबनराव इचके,नवनाथ सांडभोर,निलेश पोकळे,राजेंद्र सांडभोर,मनोहर हिलाळ,माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,कानिफ हिलाळ,अविनाश पोकळे,बाळशिराम मुंजाळ,किसन हिलाळ,आनंदा पवार, विशाल मुंजाळ बाळू रोहिले,सुरेश हिलाळ ,लहू मुंजाळ,दत्ता देवकार,भिम मुंजाळ,विलास रोहिले,पांडूरंग रोहिले आदि मान्यवर उपस्थित होते.नव्यानेच निवड झालेले अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा सत्कार माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.सभासद शेतकरी हित लक्षात घेऊन सहकारी संचालक मंडळाच्या बरोबरीने पारदर्शक कामकाज करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष साहेबराव कांदळकर यांनी यावेळी सांगितले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button