जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
कर्नल सी.के.नायडू चषक या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना कौशल तांबे याने दमदार द्विशतक (२६१ धावा) झळकावले असून त्याच्या या खेळीने ओतूर गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
ओतूर शब्द मनी आणि ध्यानी येताच सर्व प्रथम एक वाक्य बोध होते.”राम कृष्ण हरी” कारण हा मंत्र जगाला देणारे व जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे गुरू चैतन्य स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन व तेथेच समाधिस्त झालेली भूमी.ज्येष्ठ पत्रकार, लेखक,साहित्यिक,डॉ.अनिल अवचट,कवीवर्य प्रा. शंकर वैद्य या महान विभूतीची जन्मभूमी,आणि अशा या वैभवशाली परंपरा असणाऱ्या भूमीत जन्माला आलेल्या कौशलचा रूपाने आता क्रिकेटचा विश्वात ओतूरचे नाव अंतरराष्ट्रीय पटलावर झळकणार आहे.
या पूर्वी कौशलची अंडर १९ भारतीय क्रिकेट संघात देखील निवड झाली होती.त्याचा या निवडीने तमाम ओतूरकराची मान अभिमानाने उंचावली आहे.आज काल क्रिकेट विश्वात खूप स्पर्धा वाढलेली आहे. आणि या स्पर्धेत टिकायच असेल तर खूप मेहनत जिद्द आणि चिकाटीची गरज असते.तुमच्या एक दोन सामन्या मधील अपयश हे तुमचे क्रिकेटमधील भवितव्य धोक्यात आणू शकते.त्यासाठी आपल्या खेळात सातत्य राखणे गरजेचे आहे.आणि तेच सातत्य टिकवत कौशलने ही उतुंग भरारी घेतली आहे.गेली ४/५ वर्ष त्याचा खेळातील ग्राफ उंचावत चाललेला आहे.
कौशलचे वडील ऐसिपी सुनील तांबे पोलिस दलात कार्यरत होते.स्वाभाविक होते की घरात शिस्त ही असणारच.सुरुवातीस क्रिकेट अकादमीत जाऊन आपल्या शाळेचा अभ्यास करून नंतर कोचचा (प्रशिक्षक) देखरेखी खाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवले आणि नेट सराव सुरू केला.दिवस रात्र नेट वर खूप घाम गाळू लागला.हळू हळू मेहनत रंग घेऊ लागली क्रिकेट हे त्याचे प्रेम बनले.त्याने क्रिकेटलाच आपले आयुष्य आणि आयुष्यालाच क्रिकेट मानले.कारण मेहनत आणि काही तरी करण्याची जिद्द त्याचाकडे होती. त्याचा या मेहनतीचे फळ म्हणून.कौशलने त्याचा मेहनतीचा आणि प्रतिभेचा जोरावर क्रिकेटची अनेक मैदाने गाजवली अनेक विक्रम प्रस्थापित केले.
कौशल एस पी कॉलेजचा विद्यार्थी आहे.गेली ७ वर्ष महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.तो १६ वर्षाखालील गटात २०१७ मध्ये पश्चिम विभागाचा कर्णधार होता.त्याने २०१६ मध्ये १६ वर्षा खालील विजय हजारे ट्रॉफी मध्ये सौराष्ट्र विरुद्ध त्रीशतक आणि गुजरात विरुद्ध द्वीशतक झळकावले आहे.अलीकडेच विनू मंकड ट्रॉफी मध्ये दोन शतके आणि आणि चॅलेंजर्स ट्रॉफी मध्ये भारत डी चे प्रतिनिधित्व करताना ९७ धावा केल्या होत्या. तो सध्या भारतामध्ये गोलंदाजीत दुसऱ्या आणि फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर आहे गेल्या १० वर्षापासून दहा वर्षापासून तो पुण्यातील कॅडन्स अकादमी कडून खेळत आहे.
त्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) कडून २०१६ मध्ये सर्वात आशादायी खेळाडूचा पुरस्कार मिळाला आह अशा या गुणवंत खेळाडूचे मनःपूर्वक अभिनंदन आणि तमाम ओतूरकरांकडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
लेखन:- पोपट नलावडे.ओतूर संकलन:-रविंद्र भोर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पुणे जिल्हा.