जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
कुमशेत ता:-जुन्नर येथील जेजुरकर डिपीचे दोन्ही सिमेंटचे खांबळ्यांना भेगा पडल्याने कधीही डीपी कोसळून मोठा अपघात घडून गावच्या रानातील व स्थानिक शेतकऱ्यांचा ऊस पेटण्याची शक्यता ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.ही डीपी पूर्णतः नादुरुस्त झाल्याने कुमशेत मधील शेतकऱ्यांच्या डोक्यावर जणू टांगती तलवार लटकलेली दिसून येत आहे.
कुमशेत गावातील जेजुरकर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ जुन्नर यांचे दोन्हीही सिमेंटच्या खांबळ्यांना भेगा पडल्याने धोकादायक परिस्थिती झालेली निर्माण आहे.डीपी मधील फ्युज,कनेक्शन तारा,दरवाजा व इतर साहित्य मोडकळीस येऊन नादुरुस्त झालेले आहेत यामुळे लोड कनेक्शन किंवा इतर तांत्रिक दृष्ट्या या डीपीमधून आगीचे गोळेचे गोळे बाहेर पडतात या परिसरात लोकवस्ती सह मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे
या ठिकाणी गावकीचा व परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस पेटण्याची दाट शक्यता आहे.एक तर शेती मालाला बाजार नसल्याने शेतकरी मुळातच अडचणी मध्ये आहे आणि सध्या ऊस हे नगदी पीक असल्याने शेतकरी याच पिकांवर आशा धरून आहे त्यातच कारखाना वेळेत ऊस तोडणी करत नाही अशावेळी विद्युत डीपी मुळे जर उसाला आग लागली तर अनर्थ होऊ शकतो म्हणून ही डीपी असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ जुन्नर येथील कर्मचाऱ्यांना व ऑफिसमध्ये याबाबत वारंवार सूचना केलेल्या आहेत .
या ठिकाणी शेतकरी व मजूरदार मोठ्या प्रमाणात शेतीच्या विविध कामासाठी ये जा करीत असतात यामुळे पुढील धोकादायक घटना टाळण्या— साठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ जुन्नर यांनी ताबडतोब सिमेंटचे दोन्हीही खांबळे व डीपी नव्याने दुरुस्त करावी अशी मागणी प्रगतशील शेतकरी योगेश माणिकराव भगत,भरत तुकाराम डोके,सचिन रामदास डोके,रमजान इनामदार व ग्रामस्थांनी केलेली आहे.