निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला बचत गट एकत्रिकरण व आपल्या देशासाठी अनेक हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्या स्मरणार्थ नवजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने व क्रांती महिला बचत गटांनी वृक्ष लागवड व महिलांना व्यवसाय विषयी प्रशिक्षण तसेच बचत गटांना नवनवीन योजना विषयी माहिती देण्यात आली. तसेच यावेळी अनेक महिलांचे मनोगते व्यक्त झाली व यावेळी झाडे लावा झाडे जगवा या उद्देशाप्रमाणे आंब्याची झाडे वडाची झाडे यावेळी लावण्यात आली ही झाडे लावण्या मागचा उद्देश निसर्गाचा समतोल राखला जाईल व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही तसेच यावेळी बचत गटातील एकमेकींचे विचार गटामार्फत कोणकोणते व्यवसाय चालू केले जावे व्यावसायिक नवनवीन धोरणे व्यवसाय कसे चालू करायचे बचत गटांना कर्ज प्रकार याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी बचत गटातील ज्येष्ठ महिला यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी सर्व बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन एकोपा करून गप्पा गोष्टी मारून एकमेकींच्या विचारांची देवाण घेवाण करण्यात आली तसेच यावेळी नवजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा व शिवसेनेच्या शिरूर व आंबेगाव च्या उपसंघटीका सुमन साळवे, नवजीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्ष सूर्या सलीम पठान व क्रांती महिला बचत गटातील अध्यक्ष संगीता तावरे सचिव सुवर्णा मारणे या प्रमुख मान्यवर तर अनिता नवले, काजल मारणे, प्राजक्ता मारणे, कमल जाधव, विजया राऊत लीला कोकडे, प्रमिला मारणे, मनीषा मारणे, विमल मारणे, मिना कोकडे, सुरेखा कोकडे, दीप्ती धनवट, सुरेखा धनवट, सविता कोकडे, सविता रणसिंग, श्रीदेवी शितोळे, शिल्पा सोनवणे, मयुरी राऊत, सोनल जाधव, तिरंगा महिला बचत गट कोकडेवाडी अध्यक्ष भाग्यश्री जाधव, सचिव सीमा कोकडे, पल्लवी गुरव, जयश्री बागव, शारदा शेळके , सीता गोतीस, इत्यादी बचत गटातील महिला उपस्थित होत्या