जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास ग्राम व शहर या उपक्रमांतर्गत मु/पो तळेरान ता:-जुन्नर जिल्हा पुणे येथे दि.१६ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे यांनी दिली.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी तळेरान गावचे सरपंच मा गोविंद साबळे तसेच अण्णासाहेब महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे,आदिवासी आश्रम शाळेचे प्राचार्य प्रागणेश नलावडे,वाघीरे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.के.डी सोनावणे,डॉ.अनिल लोंढे महाविद्यालयातील प्राध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी.तळेरान गावामध्ये स्वच्छता अभियान, २ वनराई बंधारे,३० फुट लांबी,२.५ फुट रुंदी व १ फुट खोलीचे ५० सलग समपातळी चर, वृक्षारोपण, मतदान जन जागृती अभियान तसेच तळेरान गावचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.तळेरान गावचे सरपंच गोविंद साबळे यांनी आपल्या भाषणात गेल्या सात दिवसात विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल स्वंयसेवकांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचा तळेरान वासियांना नक्कीच फायदा होईल असेही त्यांनी मत व्यक्त केले तसेच श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कामांचे मुल्य जवळपास चार लाखांपेक्षा अधिक आहे असे नमूद केले.
श्रमसंस्कार शिबिरामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात महत्त्वाचा वाटा असतो असे मत उपप्राचार्य डॉ व्ही एम शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.आळेफाटा महामार्ग पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मा अशोक पिंपळे यांनी शिबिराला भेट देऊन शिबिरातील विद्यार्थ्यांना महामार्ग सुरक्षा सप्ताह निमित्त रस्ते अपघात टाळण्यासाठी कोणत्या खबरदारी घ्याव्यात याबाबत अपघात प्रसंगी अपघात अपघातग्रस्तांना मदत करण्याबाबतचे आवाहन केले.आपल्या भाषणात आदिवासी आश्रम शाळेचे प्राचार्य प्रा नलावडे यांनी श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्वालंबनाचे व स्वंयशिस्तीचे धडे मिळतातअसे मत व्यक्त केले.
या प्रसंगी स्वंयसेवाकांना विशेष हिवाळी शिबिर यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे यांनी केले त्यामध्ये त्यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला यामध्ये श्रमदान,स्वयंसेवकांच्या वैचारिक प्रगल्भता वाढीसाठी डॉ. डी एम टिळेकर,संतोष ताजवे,अस्लम शेख, सिद्धार्थ कसबे,राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ श्रीकांत फुलसुंदर आदी मान्यवरांची विशेष व्याख्याने, या बरोबरच स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी गट चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम व तसेच ओतूर येथील दंतचिकित्सक डॉ अमोल चौधरी यांच्या सहकार्याने आयोजित दंतचिकित्सा शिबिराचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ निलेश काळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ अजय कवाडे यांनी व्यक्त केलेशिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ अनिल लोंढे,डॉ रमाकांत कसपटे, प्रा सुवर्णा डुंबरे, तसेच प्रशासकीय कर्मचारी नवनाथ पारधी यांनी विशेष परिश्रम घेतले.