गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ

शिरूर तालुका क्रीडा संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले ऑलम्पिक पदक विजेते खेळाडू खशाबा जाधव यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त क्रिकेट स्रपर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत शिरुर ग्रामीण न्हावरा या संघाला विजेते पद मिळाले .

या स्पर्धेसाठी एकूण सात संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेचे सर्व नियोजन शिरूर तालुका क्रीडा संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन तालुका विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर किसन खोडदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे उपाध्यक्ष शामकांत चौधरी सचिव मनोज धिवार किरण झुरूंगे व सर्व क्रिडा शिक्षक उपस्थित होते. शिक्षक संघटना आयोजित क्रीडा स्पर्धेत क्रिकेट सामन्यात गोलेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक.मच्छिन्द्र गायकवाड यांच्या संघाने न्हावरे गटात प्रथम क्रमांक मिळवला.तसेच मच्छिन्द्र गायकवाड यांना सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. कृष्णामाई क्रीडा व ग्रामविकास मंडळ व ग्रामपंचायत ग्रामस्थ गोलेगाव यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.फोटो ओळी… गोलेगाव येथील क्रीडा शिक्षक मच्छिंद्र गायकवाड यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button