जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजभाषा हिंदी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहिती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.याविषयी अधिक माहिती देताना संस्थेचे सेक्रेटरी व हिंदी विभाग प्रमुख प्रदीप गाढवे म्हणाले की,”दरवर्षी ही परीक्षा महात्मा गांधी राजभाषा प्रचार संस्था,पुणे यांचे वतीने घेतली जाते.विद्यालयातील पाचशे विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला. हिंदी भाषेचा प्रचार व्हावा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हिंदी भाषेचा वापर व्हावा यासाठी ही संस्था प्रयत्न करीत आहे. चैतन्य विद्यालयाच्या खालील दहा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय राजभाषा हिंदी रत्न पुरस्काराने गौरवले गेले.
:-विद्यार्थी आणि कंसात त्यांची इयत्ता:-आरुष संतोष कांबळे,युवराज मिलिंद खेत्री (इयत्ता पाचवी); कृष्णा संजय इसकांडे(इयत्ता सहावी);गौरी दिलीप शिंगोटे (इयत्ता सातवी); सलोनी मनोहर वामन, रसिका संतोष गिते (इयत्ता आठवी); पूर्वा राजेंद्र फापाळे,ओम रवींद्र डुंबरे (इयत्ता नववी);श्रावणी यादव गायकर, ऋतुजा जयसिंग वाघ(इयत्ता 10वी)इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले.या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख प्रदीप गाढवे, ज्ञानेश्वर वळे, सोनाली माळवे, लक्ष्मण दुडे आदींनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,प्रभाकर तांबे,राजेंद्र डुंबरे,रघुनाथ तांबे, पंकज घोलप, राजश्री भालेकर, संजय हिरे आदींनी मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.