जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
युवक मित्र परिवार महाराष्ट्र राज्याचे ५ वे राज्यस्तरीय युवा संमेलन पुणे येथे घेण्यात आले. यावेळी बुक क्लब पुणेचे संस्थापक अविनाश निमसे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले.या वेळी महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील सामाजिक तन – मन व धनाने विधायक कार्य करणारे,शैक्षणिक,विज्ञान तंत्रज्ञान,महिला सबलीकरण,दुर्बल जाती जमाती कल्याण,कला साहित्य,पर्यावरण अशा विविध क्षेत्रात दिर्घकाळ काम करणाऱ्या युवक,युवती,पत्रकार, उपक्रमशिल शिक्षक यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रविण महाजन, पी.एम.पी.एल.कामगार संघ पुणेचे अध्यक्ष राजेन्द्र खराडे,मंथन फाउंडेशन पुणेचे अध्यक्षा आशाताई भट्ट जय अंबामाता स्वयंरोजगार संस्था पुणे चे मंगलाताई नागुल,समाज प्रबोधन मंच आळंदीचे मा.ह.भ.प. प्रल्हाद महाराज डांगे,सद्गुरू सेवा प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक सचिन म्हसे,युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्यचे समन्वयक बादलसिंग गिरासे,प्रदिप देवरे, मयुर जाधव व समन्वयिका सौ.आदिती निकम उपस्थित होते. यावेळी सुनिता किसन भुतांबरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फाळूकदरा (डिंगोरे) ता.जुन्नर जि. पुणे यांना जय अंबामाता स्वयंरोजगार संस्था पुणेच्या अध्यक्षा मंगलाताई नागुल यांचे हस्ते राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सर्व उपस्थित युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्यचे सर्व संचालक,पुरस्कारार्थींनी त्यांचे अभिनंदन केले.या पुरस्काराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फाळूदरा शाळेत व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल बबन तळपे,शिक्षक प्रतिनिधी प्रदीप नलावडे,सूर्यकांत जाधव,काशिनाथ भले,लक्ष्मण भले तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेआहे.या शाळेत नेहमीच अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम घेऊन मुलांना सहज मनोरंजनातून शिक्षण दिले जाते विषयानुसार उपक्रम घेऊन मुलांना अभ्यासात गोडी लावली जाते शाळेत पालक-शिक्षक सभा, महिला-पालक सभा तसेच पालक-शिक्षक व विद्यार्थी सभा घेतल्या जातात त्यामुळे मुलांच्या अडचणी,मुलांची प्रगती ही पालकांना प्रत्यक्षात पाहता येते दुर्बल, मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थी नियमित शाळेत यावेत यासाठी पालकांच्या घरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व सांगून तसेच मुलांशी जवळीक साधून शाळेत येण्यासाठी प्रयत्न केले जातात.
शाळेमध्ये नेहमी ई-लर्निंगच्या मदतीने विषयानुसार अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागते.तसेच ऐतिहासिक व भौगोलिक माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.शाळेत टॅबद्वारे अभ्यासक्रम शिकविला जातो.चाईल्ड फंड इंडियाद्वारे आदिवासी महिलांसाठी व्यवसायिक योजना राबविण्यासाठी प्रथम त्यांना शाळेत बोलावून सहभागी करून घेतली जाते त्याद्वारे बचत गट करून घेतले आणि विविध योजनांची माहिती करून दिली व चाइल्ड फंड इंडिया प्रमुखांना बोलावून त्या विविध योजना प्रत्यक्ष राबविणे यासाठी सुनीता किसन भुतांबरे यांनी विशेष प्रयत्न केले यातून या महिलांच्या संसाराला मोठा फायदा झाला.
अशा विविध उपक्रमांची दखल घेऊन युवक मित्रपरिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेने सुनिता किसन भुतांबरे यांना राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने जिल्हा परिषद पुणे सदस्य मारुती काळे,अंकुश आमले,बबन तांबे व पुणे जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे समन्वयक प्रा.रविंद्र पुनाजी पारधी,जुन्नर तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या कार्याध्यक्षा मनिषा संजय वारे,सचिव के.डी.भुतांबरे आणि सर्व सामाजिक संघटना तसेच स्थानिक विविध संस्था आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.