शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
सरदवाडी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत स्वयं ज्योत महिला ग्राम संघ व सरपंच ग्रामपंचायत सरदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दिप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ लक्ष्मीताई बाळासाहेब जाधव ह्या होत्या.
कार्यक्रमांमध्ये सीआयएफ निधी तीन लाख रुपयांची वाटप बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी शिरूर पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, ह भ प केंद्रे महाराज आळंदी ,अभियानाचे व्यवस्थापक दादासाहेब शिंदे पंचायत समिती शिरूर, शिल्पा ब्राह्मणे, सुवर्णा साकोरे डीसीआरपी बँक ऑफ इंडिया, शिरूर शाखेच्या तेजल मॅडम सरदवाडी चे उपसरपंच गणेश सरोदे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरदवाडीचे ग्रामसेवक राहुल बांदल आणि सरदवाडी गावचे सर्व महिला बचत गटाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी ग्राम संघाच्या लिपिका गीता निरवणे यांनी ग्राम संघाच्या अहवालाचे वाचन करून दाखवले. तसेच सरदवाडी गावच्या सीआरपी संगीता मिडगुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन करून कार्यक्रम पार पाडण्यास मदत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली रासकर यांनी केले तर आभार ग्राम संघाच्या सचिव शारदा घावटे यांनी मानले.