टाकळी हाजी (प्रतिनिधी)
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा शिवनगर या शाळेमध्ये आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर विजय थोरात यांनी विद्यार्थ्यांना बँक व्यवहाराविषयी आणि डिजिटल या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली.आपण बँकेत पैसे का ठेवतो? कसे ठेवतो? तसेच बँकेतून पैसे कधी काढतो? कशासाठी काढतो? कसे काढतो? इत्यादी प्रश्नांविषयी प्रात्यक्षिकासह माहीती दिली.
पैसे काढण्याची पावती,पैसे ठेवण्याची पावती याविषयी महिती दिली.खाऊसाठी घरून मिळालेले किंवा पाहुण्यांकडून मिळालेल्या पैशांची बचत कशी करावी,हे सांगताना बचतीचे महत्त्व विषद केले. मुलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरे दिली.बँकेचे अधिकारी थोरात उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला.
यावेळी विध्यार्थ्यांबरोबर राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक मुख्याध्यापक बाळासाहेब घोडे आणि सहशिक्षक राजेंद्र नरसाळे उपस्थित होते.