प्रतिनिधी : जिजाबाई थिटे

यवत ता.५ जानेवारी मॅजिक बस इंडिया फौंडेशन( Magic Bus India Foundation) ही एक सामाजिक संस्था असून किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी मागील २३ वर्षापासून भारतामध्ये कार्यरत असून एकूण २४ राज्यांमध्ये आणि एकूण ०७ देशांमध्ये ह्या संस्थेचे कार्य असून आतापर्यंत एकूण ०४.७५ लाख सहभागी मुले-मुलीं या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन समाजातील वंचित कुटुंबातील मुले-मुली आणि युवक-युवतींना शिक्षण ते रोजगार या प्रवासामध्ये सातत्याने मार्गदर्शन करते.

त्यांच्या वयानुसार उपक्रम घेऊन त्यांच्यातील जीवन कौशल्ये विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे प्रयत्न करते जेणेकरून ते शिक्षण घेण्यासाठी प्रेरित होतील आणि स्वतःमधील क्षमता ओळखून स्वतःच्या स्वप्नांना पूर्ततेच्या दिशेने पावले टाकत स्वतःच्या आयुष्यासंबंधी विचार करून उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्यात सक्षम होतात.त्याचबरोबर स्वतःच्या कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी अधिक चांगल्या रीतीने तयार होतात आणि उदर निर्वाह विकासासाठी उपयुक्त संधीचा लाभ घेण्यासाठी सक्षम होतात.दौंड तालुक्यातील ११ गावा मध्ये मॅजिक बस काम करत आहे त्यात देऊळगाव गाडा, वरवंड,खोर,यवत,राहू,कासूर्डी,खामगाव,केडगाव,नाथाचीवाडी, भांडगाव,खुटबाव या गावांमध्ये संस्था काम करत आहे.बाल पंचायतचे प्रतिनिधी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे निवडले जातात.

बाल पंचायत ही प्रक्रिया आणि दृष्टीकोन म्हणजे मुलांना त्यांचे हक्क समजून घेण्यास पाठिंबा देऊन,त्यांना त्यांचे मत देण्यासाठी आणि त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.प्रतिनिधी म्हणून निवडलेल्या विद्यार्थ्यांनी सत्रांमध्ये भाग घेणे,बैठकीपूर्वी नियुक्त केलेले काम पूर्ण करणे,सहकारी विद्यार्थ्यांकडून इनपुट आणि सूचना मागवणे आणि त्यांच्या शाळेतील क्रियाकलाप विकसित आणि आयोजित करण्यास मदत करणे अपेक्षित आहे.मुलांच्या जीवनात मूल्य जोडण्याची प्रक्रिया करणे बाल पंचायत स्थापनेचा मुख्य उद्देश मुलांमध्ये वर्तनात्मक बदल घडवून आणणे आणि शाळा किंवा समुदायाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक समर्थन प्राप्त करण्यासाठी भागधारकांशी संलग्नता आणणे हा आहे.बाल पंचायतीची प्रक्रिया आणि दृष्टीकोन म्हणजे मुलांना त्यांचे हक्क समजून घेण्यास पाठिंबा देणे,त्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी व्यासपीठ देणे आणि त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या निर्णयांवर प्रभाव टाकणे.बाल पंचायत मुलांना त्यांच्या भावना,विचार व्यक्त करण्यास सक्षम करेल; येथे ते सहभागी होऊ शकतात,खेळू शकतात,झोपू शकतात,हसू शकतात,खाऊ शकतात आणि त्यांची सर्जनशीलता वाढवणाऱ्या अनेक गोष्टी करू शकतात.आज दिनांक ४ जानेवारी रोजी जयहिंद विद्यालय कासुर्डी येथे EVM मशीनच्या सहाय्याने निवडणुकीचया माध्यमातून बालपंचायत निवडण्यात आली .

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक जी.के.थोरात सर,मॅजिक बस इंडिया फौंडेशनचे तालुका समन्वयक रजनीकांत भोसले सर,जीवन कौशल्य प्रशिक्षक पल्लवी साबळे,योगेश वानखडे,तसलिम बागवान,गौरी पोपेरे उपस्थित होते.त्याचबरोबर जयहिंद विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नाळे सर, सहशिक्षक जगताप सर,म्हेत्रे मॅडम,शेवते सर,मेरगळ सर,ढवळे सर,सातपुते सर,शेंडगे सर,कांचन सर,लांडगे सर, बारवकर मॅडम, तरंगे सर, कारंडे सर,भिसे मॅडम,जगताप मॅडम,चव्हाण मॅडम,भिसे मॅडम,गाढवे सर,आखाडे मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी जाधव मामा,कोकरे मामा,शिंदे मामा,सोनवणे अण्णा,कासवेद मामा, प्रकाशमामा वीर इत्यादी उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button