जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
संकष्ट चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कुरण तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 85 लक्ष रुपये डांबरीकरणासाठी आणि सात लाख रुपये व्यायाम शाळा साहित्यासाठी इतका निधी आढळराव पाटील यांनी ग्रामस्थांना मिळून दिला त्याबद्दल प्रास्ताविकामध्ये कुरण गावचे विद्यमान उपसरपंच सचिन नवले यांनी आढळराव पाटलांचे आभार मानले
आढळराव पाटलांनी हा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत स्वतःच्या गावाला मंजूर असताना देखील तो निधी कुरण ग्रामस्थांना देणारे आढळराव पाटील हे महाराष्ट्रातील पहिले खासदार आहे असेही नवले यांनी सांगितले
पंधरा वर्षे खासदार राहिल्यानंतर आत्ता पराभव झाला असला तरी कोरोना काळातही घरी न थांबता लोकांमध्ये त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काम करीत असून कोरोना काळात 35 ते 40 गाडी धान्याचे वाटप केल्याचे हे त्यांनी सांगितले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना फेसबुक पोस्ट आणि शुभेच्छा दिल्याबद्दल रावतांनी माझी पक्षातून हाकलपट्टी केली यात माझं चुकलं काय हे जनतेसमोर सांगायला आढळराव विसरले नाहीत हा प्रश्न त्यांनी यावेळेस कुरण गावातील ग्रामस्थांना केला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चारशे गावांना रस्ते सात लाख रुपयांचा निधी दीड वर्षात मिळून दिल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे 80 कोटी रुपये बिपट सफारीसाठीही मुख्यमंत्र्यांकडून मंजूर केले असून जुन्नर नगर परिषदेतील 20 कोटी रुपये पाण्याची योजना देखील आढळराव यांच्या प्रयत्नाने झाली असल्याचे सांगितले कुरण येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे सांगतील तिथून निवडणूक लढवणार मला काही कमी नसून माझे अमेरिकेत देखील ऑफिस असल्याचेही त्यांनी सांगितले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणापेक्षा समाजकारण करण्याची शिकवण दिल्याचे सांगायला ते विसरले नाहीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालिका प्रियंका ताई शेळके यांनी बोलताना आढळराव पाटील यांचा भावी संसद रत्न खासदार असा उल्लेख करून त्यांना आता गल्लीतून परत दिल्लीत पाठवणार असल्याचे सांगितले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाब शेठ पारखे यांनी आढळराव पाटील यांना आजी खासदारच म्हणा कारण विद्यमान खासदार बऱ्याच लोकांना माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले यावेळेस यावेळी कुरण गावातील अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ महिला भगिनी आणि विशेषता तरुणांची गर्दी देखील या कार्यक्रमासाठी होती
या कार्यक्रमासाठी मंचर चे सरपंच सुनील बाणखेले शिवाजीराव राजगुरू त्याचप्रमाणे खंडू शेठ शिंदे जालिंदर तांबोळी कृषी उत्पन्न बाजार जुन्नर च्या संचालिका प्रियंका ताई शेळके धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके सीमाताई नवले सरपंच कुरण शिरोली बुद्रुक कृषक संस्थेचे ज्येष्ठ संचालक रामदास नाना नवले मारुती दादा नवले कुरण शाखाप्रमुख गणेश शेठ नवले माजी उपसरपंच दत्तात्रय नवले ग्रामपंचायत सदस्य दिलीप गव्हाणे मीराताई नवले शिल्पाताई आमले वैशालीताई पोपळकर आणि गावातील तरुण आणि जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले प्रस्ताविक उपसरपंच सचिन नवले यांनी केले उपस्थित सर्वांचे आभार ज्येष्ठ व्यक्तिमत्व मारुती दादा नवले यांनी मानले.