निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार

कोरेगाव भिमा येथे १ जानेवारी २०२४ रोजीच्या विजयस्तंभास शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-अहमदनगर या महत्वपुर्ण हायवे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

पेरणे ता.हवेली जि.पुणे येथील लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत पुणे-अहमदनगर महामार्गलगत भीमा नदीच्या तीरावर दि.०१ जानेवारी २०२४ रोजी विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम दरवर्षी साजरा होत असतो.या कार्यक्रमासाठी देशभरातून मोठया प्रमाणात जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहत असतो.

दि.१ जानेवारी २०२४ रोजी विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमामुळे पुणे-अहमदनगर या महत्वपुर्ण महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पुणे-अहमदनगर महामार्ग क्र. ६० वरील वाहतूक दि-३०/१२/२०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजल्यापासून ते दि.०१/०१/२०२४ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत बंद करुन खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे .

शिक्रापूर ते चाकण व चाकण ते शिक्रापूर अशी जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जङ-अवजड व इतर वाहने ही शिरुर-न्हावरा फाटा,न्हावरा- पारगांव- केडगांव चौफुला-यवत- सोलापूर रोड हडपसर या मार्गे पुणेकडे येतील. पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व इतर वाहने ही पुणे-खराडी-हडपसर- सोलापूर हायवे रोडने केडगांव चौफुला-पारगांव-न्हावरा शिरुर मार्ग अहमदनगर रोड अशी जातील.मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड- अवजड व मालवाहतूक (ट्रक टेम्पो इ.) ही वाहने वडगांव मावळ- तळेगांव-चाकण- खेड- नारायणगांव-आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील.मुंबई व ठाणेकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार,जीप इत्यादी ही वडगांव मावळ-तळेगांव- चाकण-खेड- पाबळ- शिरुर मार्ग अहमदनगर अशी जातील.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button