शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर मंगळवार दि. २ जानेवारी ते सोमवार दि.८ जानेवारी २०२४ या वेळेस शिरूर तालुक्यातील पूर्व भागामधील गुनाट येथे संपन्न होणार आहे
या विशेष शिबीरासाठी उद्घाटक म्हणुन अध्यक्ष महाविद्यालय नियामक मंडळ प्रकाशशेठ धारिवाल तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ अनिल बोरा तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सचिव शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ प्राचार्य नंदकुमार निकम, सदस्य महाविद्यालय नियमक मंडळ धरमचंदजी फुलफगर, सदस्य शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ कुमार बोरा, प्राचार्य डॉ.के. सी.मोहिते, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप साहेब,सरपंच गुनाट सुनंदा शिवाजी कोळपे व ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. शिबीरामध्ये युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास लोकसंख्या नियंत्रण जनजागृती
या उपक्रमांतर्गत विशेष आयोजन करण्यात आले आहे तसेच शिबीर काळामध्ये विविध प्रकल्प, ग्रामस्थांसाठी विशेष कार्यक्रम – प्रेरणादायी प्रवास, अंधश्रद्धा निर्मूलन, काव्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध व्याख्याते यांचे व्याख्यानमाला सामाजिक सुरक्षा व युवकांचे योगदान असे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे
या शिबीरामध्ये विविध मार्गदर्शक व्यक्तींची सदिच्छा भेट होणार आहे शिबीराचा समारोप वार सोमवार दि. ८ रोजी सकाळी ११ वाजता शिरूर-हवेलीचे आमदार अशोकबापू पवार व कार्यक्रमाचे अधिकारी, समिती सदस्य, प्रमुख उपस्थिती, पत्रकार मित्र सर्व शिबीरार्थी स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना प्राध्यापक, सर्व सामाजिक,राजकीय पदाधिकारी, युवा ग्रुप यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.