जुन्नर प्रतिनिधी :-रविंद्र भोर
उदापुर ता:-जुन्नर येथील नवसाला पावणारागुरुदेव दत्त मंदिरात मंगळवार दिनांक:-२६ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचे औचित्य साधून देव जन्माचा सोहळा मोठया थाटामाटात संपन्न झाला अशी माहिती मंदिराचे संस्थापक रत्नाकर वल्व्हणकर यांचे वंशज व सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन वल्व्हणकर यांनी दिली.
उदापुर येथील हे दत्त मंदिर खूप पुरातन असून याची स्थापना,मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन दिवंगत रत्नाकर वलव्हणकर यांनी केलेली असून त्यांच्या मागे त्यांचे चिरंजीव मोहन वलव्हणकर सर्व पूजाअर्चा व धार्मिक कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर असतात.या मंदिरात अनेकांची इच्छा पूर्ण झाली आहे त्यामुळे याठिकाणी अनेक व्यक्ती नतमस्तक होण्यासाठी येतात .
सकाळी मांडव डहाळे व प्रतिमा मिरवणूक, त्यानंतर गुरुचरित्र पारायण आणि ठीक बारा वाजता देव जन्माचा सोहळा आरतीने संपन्न झाला सायंकाळी सत्यनारायण महापूजा आणि संध्याकाळी महाप्रसाद भविकभक्तांसाठी आयोजित करण्यात आला होता यावेळी गावातील अनेक भजनी मंडळांनी आपली गायन कला सादर केली.यावेळी चिंबळीचे उद्योजक अनुराग जैद,ज्ञानेश्वर कड तसेच येंधे हिवरे गावचे सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,तंटामुक्ती चे अध्यक्ष यांनी व सह्याद्री गणेश मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने देखील हजेरी लावली यावेळी मंदिराचे मुख्याधिकारी मोहन वलव्हणकर व वर्षा वलव्हणकर यांनी उपस्थित सर्वांचा सत्कार केला केला.यावेळी दत्त जन्मोत्सव व पारायणाचे पौरोहित्य पंडित वैद्य यांनी केले.