शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यामधील पुर्व भागातील गुनाट येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त देवस्थान जयंती सोहळ्याचे औचित्य साधून गुनाट नगरीतील तरुण युवकांनी एकत्रित येऊन एक संकल्प करून भव्य हापपीच क्रिकेट बॉल स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेमध्ये अनेक गावातील मान्यवरांनी विशेष असे बक्षीस रुपी योगदान देऊन सहकार्य केले. त्यामध्ये गावच्या कुठल्याही उपक्रमामध्ये अभूतपूर्व योगदान असते असे मान्यवर यामध्ये सहभागी झाले होते. हा क्रिकेट चा सामना ५ दिवस चालू होता यामध्ये *प्रथम क्रमांक – अवधूत फायटर द्वितीय क्रमांक – गणेश क्रिकेट क्लबतृतीय क्रमांक – जाणता राजा क्रिकेट क्लब चतुर्थ क्रमांक – संस्कार ग्रुप गुनाट* असे या सामन्यामध्ये चार संघ विजेते झाले तसेच *स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी झाले होते 1.अवधूत फायटर2.गणेश क्रिकेट गुणवंतवाडी 3.जाणता राजा गुनाट 4.संस्कार ग्रुप गुनाट 5.छावा ग्रुप विकासवाडी6.किंग एलेवन 7.रायगड फायटर8.गणराज क्रिकेट गुणवंतवाडी9. कोळपेवाडी क्रिकेट10.गुनाट लिजेंड क्रिकेट* या सर्व सहभागी टीमचे गुनाट ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले विशेष सहकार्य संस्कार युवा मंच, मा.सरपंच संदेश करपे, मा.सरपंच गणेश कोळपे,उद्योजक पांडूरंग गव्हाणे, चेअरमन राजेंद्र कोळपे, गोरख धुमाळ, ग्रा.सदस्य रामदास काकडे, युवा कार्यकर्ते तेजस भगत, युवा उद्योजक अक्षय भगत , मेजर हर्षद डोंगरे, विजय गाडे सर, सतिष डोंगरे, गणेश गव्हाणे सर,अनिल थोरात,सूरज करपे, अमोल भोरडे,व ग्रामस्थ सरपंच, उपसरपंच आजी-माजी पदाधिकारी ग्रामपंचायत, विकास सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन, सर्वांचे मार्गदर्शन लाभले व युवा तरुण वर्ग आयोजक ऋषी गव्हाणे मित्र परिवार यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला.