शुभम वाकचौरे
मंगरूळ पारगाव येथे कैवारी फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम. नाताळ व नवीन वर्षाच्या निमित्ताने कैवारी फाउंडेशन जांबुत च्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले.स्वप्नवेध अनाथ आश्रम ला किराणा किट, खाऊ चे वाटप करण्यात आले.
या उपक्रमा मधून लहान अनाथ मुलांना नाताळचा आनंद मिळावा. व त्यांना गरजे च्या वस्तू मिळाव्या. आणि आपल्याकडून सामाजिक काम व्हावे. या हेतूने कैवारी फाउंडेशन जांबूत ने हे उपक्रम राबविले. स्वप्नवेध अनाथालय येथे भेट देऊन एक वेगळ्या पद्धतीने नाताळ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन कैवारी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले होते. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. या भावनेने तसेच अनाथ मुलांनाही जीवनात आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळाली.पुणे शहर व जिल्हा भरात अनाथांसाठी झटणारे अनेक दाते आहेत. ते आपल्या उत्पन्नातील काही रक्कम अशा आश्रमांसाठी सढळ हाताने देत असतात, एकीकडे या स्वप्नवेध अनाथ आश्रमाला शासनाचे अनुदान नाही तर दुसरीकडे दातृत्वाचा झरा आटलेला अशा स्थितीत या आश्रमांमध्ये सध्या ‘दात काेरून पाेट भरण्यासारखी ’ स्थिती आहे. काही दात्यांनी केलेल्या मदतीवर कसे बसे पोटाची भूक भरली जाते . आश्रम चालविणाऱ्यांची माेठी कोंडी हाेत आहे.या संस्थांना मिळणारी मदत मंदावल्यामुळे अशा अनाथ निराधारांनी खायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कैवारी फाउंडेशनच्या मुळे काहीतरी मदत मिळाली आहे.
या प्रसंगी पा. फुलसिंग मावळी, दिलिप कुवर, संतोष ढवळे, कांदळकर काका, चोरे काका,सुदाम साबळे,संपत ढवळे, कचर गायकवाड, प्रकाश खराडे, ईश्वर भोसले,अमोल मेहेर, प्रविण सोळसे,केतन संभेराव, शुभम गायकवाड, अरुण भोसले, मयूर खराडे,सचिन भोजने आदी मान्यवर उपस्थित होते.