प्रतिनिधी : सचिन थोरवे
शिवजन्मभूमि जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी शहरातील आणि या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मराठा समन्वयक आणि जुन्नर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार सो यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार साहेब यांनी आपण यापुढील काळात आंदोलन करत असताना आपण ते शांततेच्या मार्गाने करावे त्याचप्रमाणे तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा कुठला अनुचित प्रकार कोणी घडवून आणत असल्यास त्याची माहिती आम्हाला कळवण्याच्या सूचना पवार साहेब उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या शांतता कमिटीला दिल्या मराठा शांतता कमिटीच्या सर्व सर्व सदस्यांनी पोलीस स्टेशनला सहकार्य करण्याचे सांगितले असताना शहरात मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आडून कुणी समाजकंटकांनी काही अनुचित प्रकार घडून आणल्यास मराठा समाजातील आंदोलकांवर गुन्हा दाखल न करता आपण त्याची प्रथमता शहानिशा करूनच संबंधितांवर कारवाई करावी अशी विनंती शांतता कमिटीच्या वतीने पवार साहेब यांना करण्यात आली शांतता कमिटीचे प्रस्ताविक गोपनीय विभागाच्या लोहोकरे मामा यांनी केले त्यानंतर साहेब परिसर नारायण पवार यांनी मार्गदर्शन केले यावेळी मराठा समन्वय गणेश महाबरे रुपेश जगताप नरेंद्र तांबोळी शैलेश कासार शिवाजी वरपे विवेक पापडे महेश शेटे सचिन थोरवे इत्यादी उपस्थितसर्वांचे आभार विवेक पापडे यांनी मानले.