शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकळी भीमा (घोलपवाडी) शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच पार पडली याप्रसंगी अध्यक्षपदी मनिषा हनुमंत घोलप व उपाध्यक्षपदी राहुल पोपट घोलप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी प्रसिद्ध गाडामालक विलास रामभाऊ घोलप,उद्योजक चेतन घोलप, उद्योजक मनोज घोलप,उद्योजक दत्तात्रय वडघुले,प्रियांका घोलप,पल्लवी गलांडे, वर्षा चौधरी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश भंडारे सर, मनिषा भंडारे मॅडम उपस्थित होते. यावेळी शाळेच्या कामकाजाबाबत राबविलेल्या अनेक उपक्रमांची माहिती घेण्यात आली.यावेळी शाळेच्या नवनिर्वाचीत अध्यक्षा मनिषाताई घोलप यांनी या अगोदर शाळेत अनेक नविन उपक्रम राबविले होते,तसेच आता शाळेच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून शाळेच्या विकासासाठी अनेक नविन उपक्रम,योजना राबविणार असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन पल्लवीताई गलांडे यांनी केले तर आभार सुरेश भंडारे सर यांनी केले.