जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे विचार घेऊन, देशातील शेतकरी, गोरगरीब जनतेच्या हिताचे काम मराठा महासंघ करीत आहे. नोकरी शोधणारा नको तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारा मावळा घडवायचा आहे असे सौ.कुमुदिनी चव्हाण यांनी रायगड जिल्हा अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच दिले पहिले स्टेटमेंट.देव दिवाळीच्या दिवशी १३ डिसें २०२३ रोजी भारतीय मराठा सेवा संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष मा.श्री.प्रतापराव गाथे यांच्या शुभ हस्ते चोचिंदे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला.

या वेळी रत्नागिरी,सिंधुदुर्गचे संपर्क अध्यक्ष मा.अजय राणे साहेब. निवृत्त तहसीलदार मा. दाते साहेब, निवृत्त पोलीस निरीक्षक, रेणुसे साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष मा.संदीप सकपाळ साहेब,रायगड सचिव मा. सुरेश मोरे साहेब,इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button