जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर येथील ऊस तोडणी कामगार महिलांना डिसेंट फाउंडेशन जुन्नर या सामाजिक संस्थेच्या वतीने सतराशे साड्यांचे वाटप खासदार डॉ अमोल कोल्हे ‘व कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले की ‘ डिसेंट फाउंडेशन ही सेवाभावी संस्था तळागाळातील वंचित घटकांसाठी काम करत असून शिक्षण , आरोग्य व कृषी आणि सामाजिक या क्षेत्रामध्ये काम करीत आहे . त्यांचे सर्वच उपक्रम हे समाज उपयोगी आणि कौतुकास्पद आहेत ‘ तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी डिसेंट फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून तळागाळातील लोकांपर्यत विविध स्वरूपात मदत करून डिसेंट संस्थेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे .
तसेच दरवर्षी आपण कारखान्यातील ऊस तोडणी कामगार भगिनींना साड्यांचे वाटप करीत असल्याबददल डिसेंट टिमचे आभार व्यक्त केले .
यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक आणि श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई,विघ्नहरचे कार्यकारी व्यवस्थापक भास्कर घुले ,संचालिका पल्लवी डोके, पंचायत समिती जुन्नरचे कृषी अधिकारी निलेश बुधवंत , जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ . मनोज काजळे, डॉ. प्रवीण शिंदे,फकीर आतार, संदिप ताजणे,सरपंच आदिनाथ चव्हाण, विशाल बनकर ,बाळासाहेब खिलारी,प्रा. शरद मनसुख, प्रा. एकनाथ डोंगरे , प्रा. अनिल उंडे, शिरीष डुंबरे,अवधूत शिंगोटे, वैभव फाफळे,पांडुरंग तोडकर,जयशिंग वायकर,तेजेवाडीचे उपसरपंच संतोष नायकोडी,गणेश मेहेर, सत्यवान खंडांगळे,संतोष रोकडे,मंगेश मेहेर,प्रवीण शेळके,सुनीता शिंदे,सेक्रेटरी अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील,संदीप जाधव आदी मान्यवर व ऊस तोडणी कामगार व महिला भगिनीं तसेच मजूर मोठया संख्येने उपस्थित होते.