प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री भैरवनाथ माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्यांचे डिसेंबर २०२२ अखेर वय १८ वर्षे पूर्ण आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणी करावी असे आवाहन नवीन मतदान नोंदणी अभियान कार्यक्रमात प्राचार्य तुकाराम बेनके यांनी केले.
संपूर्ण जगामध्ये भारत हे लोकशाही राष्ट्र आहे त्यामुळे मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे विकसित भारताच्या जडणघडणीत उद्याला सक्षम नेतृत्व मिळावे,जनजागृती व्हावी यासाठी युवकांनी मतदार नोंदणी करणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले या अभियानाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गाव कामगार तलाठी मनिषा आगवणे यांनी लोकशाही मध्ये मतदानाचे महत्व सांगितले महसुली प्रशासनाच्या माध्यमातून ग्राम स्तरावर असलेल्या विविध योजनांचा देखील उहापोह आगवणे यांनी केला.
या कार्यक्रमासाठी बी.ऐल.ओ.शरद शेलार,सुनील म्हाळसकर,काळे गुरूजी,तलाठी कार्यालयीन लेखनिक सागर अवचिते,ग्रामस्थ आजू कोळपे ,मच्छिंद्र बेनके लक्षण हरीहर इ..मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार दिलीप वाळके यांनी मानले.