आदिवासी बांधवांच्या मागणीला आले यश.
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
गेली अनेक वर्षे जुन्नर तालुक्यातील उत्तरेकडील अतिदुर्गम आदिवासी भागातील कोपरे,मांडवे,मुथाळणे,जांभुळशी,पुताचीवाडी,जोशीवाडी,शैलाचा माळ,माळीवाडी,अगवणेवस्ती,चारमोरी,गावठाणवाडी,मारकुलवाडी, व खासकरून गडदीचे (डोंगरातील कपारी)अतिदुर्गम आदिवासी या भागातील जनतेच्या मागणीनुसार आज शुक्रवार दि:-१ डिसेंबर २३ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने नारायणगाव आगाराची लालपरीची एसटी बस जी कोपरे गावात मुक्कामी जात होती त्या बसची फेरी अकोले तालुक्यातील फोफसंडी गावापर्यंत विस्तारित करून सुरुवात केल्याने सर्व आदिवासी बांधवांच्या मागणीला यश आनंदित झाले असून या लालपरीच्या जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. फोफसंडी हे गाव नगर जिल्ह्यातील अकोले या १००% पेसा अंतर्गत अतिदुर्गम आदिवासी गाव असून जम्मू काश्मीरमधील सौंदर्य येथे खच्चून भरलेले असल्याने लव्हासा पेक्षा अधिक सुंदर हे गाव इतिहासात नोंद असणारे हे गाव हरीचंद्रगडाच्या पूर्व पायथ्याशी वसलेले आणि कुंजीरगड(कोंबड किल्ला)मांडव्य ऋषि यांची तपोभूमी, मांडवी नदीचा उगम,कोंड्या नवले यांचे वास्तव्याने पावन झालेली गडद आणि सूर्याला देखील येथे प्रकाशित करण्यासाठी दुपारी डोक्यावर जावे लागते असे हे इंग्रज काळात पोप यांना भुरळ घालणारे हे गाव अनेक वर्षे विकासापासून वंचीत होते मात्र अलीकडे या आदिवासी भागातील दळणवळण वाढल्याने जुन्नर,अकोले आणि संगमनेर व इतर शहरांशी संपर्क निर्माण झाला तो खाजगी वाहनांमुळे.मात्र सरकारी म्हणजे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीबस येथे पोहचली नव्हती.
या संदर्भात या आदिवासी भागातील बांधवांनी १५ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ओतूर, नारायणगाव व पुणेविभागाला पत्र पाठवून फोफसंडी या गावात एसटी बस ची मागणी केली त्यानुसार परिवहन महामंडळाने मागणी मान्य करून रोज कोपरे गावात मुक्कामी लालपरीला विस्तारित करून हीच बस पुढे कोपरे पासून ९ किमी अंतरावर असलेल्या फोफसंडी येथे मुक्कामी आज पासून सुरुवात केली आहे. यासाठी महामंडळाने या बदल्यात या कामगिरीवर असलेले वाहक व चालक यांच्या रात्रीच्या विश्रांतीची,पिण्याच्या पाण्याची सोय तसेच शौचालयाची सोय ग्रामस्थांनी करावी असे सुचविले आहे.जर सोय झाली नाही तर सदर एसटी बसेसच्या फेरी बंद करण्यात येईल असे देखील सांगितले आहे.
या बस फेरी सेवा नारायणगाव आगारातून ओतूर, उदापुर,मांदरणे,मुथाळणे,पुताचीवाडी,मांडवे,कोपरे आणि फोफसंडीअसा मार्ग असणार असून यामुळे दोन तालुके व दोन जिल्हे एकमेकांना जोडले जाऊन पर्यटनाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.आदिवासी भागातील शेतकरी,मजूर ,विद्यार्थी यांना फायदा होईल असे वाटते.