शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथिल श्री सुर्यमुखी दत्त देवस्थानच्या वतीने त्रिपुरारी पौणिमेच्या निमित्ताने दिपोत्सव व तुळशी विवाह कार्यक्रमाच्या निमित्ताने मालेगाव येथिल तहसिलदार डॉ क्षितिजा काळे बोलत होत्या श्री सुर्यमुखी दत्त देवस्थानच्या महाआरतीसाठी त्या सहकुटूंब उपस्थित होत्या
तहसिलदार काळे पुढे म्हणाल्या की देवस्थानच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना खुले व्यासपीठच देवस्थान उपलब्ध करून देत आहे स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिकेची व्यवस्था देवस्थान वतीने करण्यात येणार असल्याने शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दत्त मंदिर व परिसरात भव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला तुळशी विवाह साजरा करण्यात आला तुळशी विवाह सोहळ्यास परिसरातील महिलांची उपस्थिती मोठी होती श्री सुर्यमुखी दत्त देवस्थानच्या वतीने दर महिन्याला विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आलेल्या सर्व भाविकांसाठी पार्वती फाउंडेशन पुणे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी उद्योजक व पार्वती फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब जासुद अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे ग्राहक संरक्षण विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष अँड संदिप काळे न्हावरा गावचे तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष सुनिल कदम पुणे जिल्हा मध्यवती बँक निमोणे शाखेचे शाखा व्यवस्थापक रमेश नातू कापड व्यवसायिक संतोष झेंडे मोटेवाडी गावचे माजी सरपंच जीवन जासुद अँड हेमलता जासुद बांधकाम व्यावसायिक शंकर येलभर संतोष चोरमले रोहिदास बढे संदिप जाधव सुषमा वाळके गणेश खोल्लम यांच्यासह परिसरातील महिला व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते
महाप्रसादानंतर मोटेवाडी निमोणे भजनी मंडळाच्या वतीने श्री सुर्यमुखी दत्त देवस्थानमध्ये भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन बढे यांनी केले