जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:–जुन्नर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान आणि राजकीय व्यवस्था या विषयावर डॉ नंदकिशोर उगले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांनी दिली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.आजच्या कार्यक्रमाचे प्रमुखव्याख्याते डॉ नंदकिशोर उगले यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटना देशाचा सर्वोच्च कायदा आहे.जगातील अनेक राज्यघटनेचा तुलनात्मक अभ्यास करून भारतीय समाजव्यवस्थेला पूरक अशी राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिली. भारतीय संविधानाने समतेवर आधारित समाज निर्माण केला, मूलभूत हक्कांच्या माध्यमातून नागरिकांना व्यक्ति– स्वातंत्र्य प्रदान केले.
राज्यघटनेने कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीसमूहाला थारा दिलेला नसून अंतिम सत्ता ही भारतीय जनतेला प्रदान केली आहे.प्रत्यकाने संविधान समजून घेतले पाहिजे, भारतीय संविधानाची प्रत प्रत्येक घराघरात पोहचविण्याची जबाबदारी तरुणांची आहे असे मत व्यक्त केले.डॉ.दत्तात्रय टिळेकर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रीकेचे वाचन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ व्ही एम शिंदे, डॉ के डी सोनावणे, डॉ व्ही वाय गावडे, डॉ गव्हाळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अमोल बिबे यांनी तर सुत्रसंचलन डॉ निलेश काळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा अजय कवाडे, डॉ रमाकांत कसपटे,डॉ अनिल लोंढे,डॉ विनायक कुंडलीक यांनी मोलाचे सहकार्य केले.