जुन्नर प्रतिनिधी:–रविंद्र भोर
श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्र,राजुरी (दिंडोरी प्रणित) ता:- जुन्नर,जि.पुणे या केंद्रामार्फत महिलांसाठीनियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात.केंद्राद्वारे अथक प्रयत्नामुळे महिला सक्षमीकरणासाठी फार मोठी मदत झाली आहे.श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्र या केंद्राच्या वतीने संकल्प अन्नपूर्णा केंद्राच्या महिला लाभार्थी यांना दिवाळी निमित साडी व फराळ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमानिमित्त केंद्र प्रतिनिधी सारिकाताई विवेक शेळके (उत्तर पुणे जिल्हा प्रतिनिधी) यांनी संकल्प अन्नपूर्णा केंद्र च्या कार्याचा गौरव करताना संकल्पचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांचे अभिनंदन केले व उपस्थित महिलांना संबोधित करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास महिलांनी संपर्क साधावा तसेच त्यांना सर्वतोपरी शक्य मदत केली जाईल असे सांगितले. सदर कार्यक्रमास महिला सेवेकरी सारिकाताई रामदास सरोदे,संगीताताई ज्ञानेश्वर शेळके,अश्विनीताई वैभव शिंदे,मीनाताई अविनाश पाटील औटी,सुनीता संतोष रायकर तसेच कु.मयूर वैभव शिंदे,संकल्प अन्नपुर्णा चे उपाध्यक्ष जीलानी पटेल,जब्बार इनामदार, वसीम पटेल, सुफियान मोमीन व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राजुरी व उंचखडक महिला सेवेकरी यांची फार मदत झाली.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जिलानी पटेल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे संकल्प च्या वतीने आभार व्यक्त केले.