जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत च्या माध्यमातून गायरान जागेमध्ये गेली पाच दिवसांपासून अनधिकृतपणे अतिक्रमण सुरू आहे? सदर जागा ही गायरान असून ग्रामपंचायतकडे फक्त देखभाल करण्यासाठी आहे.परंतु स्वतः ग्रामपंचायत- नेच या जागेमध्ये पत्रा शेडचे अतिक्रमण सुरू केले आहे ? सर्वसामान्य नागरिकांनी अतिक्रमण केले तर त्वरित कारवाही केली जाते, परंतु इथे ग्रामपंचायतच अतिक्रमण करत असल्याचे दिसून आले याबाबत दाद कोणाकडे मागायची; असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांत पडला आहे.:- गटविकास अधिकाऱ्यांना माहिती नाही, तहसीलदार माहिती घेऊन सांगणार : गटविकास अधिकारी हेमंत गरिबी यांच्याशी संपर्क केला असता याबाबत मला काहीही माहिती नाही ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करतो असे सांगितले. तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याशी संपर्क केला असता याबाबत स्थानिक तलाठी आणि गटविकास अधिकारी यांना पाहणी करण्यास सांगुन माहिती घेतो असे सांगितले.
या ठिकाणच्या कामाची कोणत्याही प्रकारची वर्क ऑर्डर नाही. या ठिकाणी पत्रा शेड करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. परंतु त्या अगोदर जागेसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते. यामध्ये त्रुटी असून त्या दुरुस्ती करून जिल्हाधिकारी यांची परवानगी आल्यानंतर काम सुरु करा. घाई करू नका असे सरपंच यांना सांगितले आहे. सदर कामाचे कुठलेही बिल आता केले जाणार नाही.
– संजय जंजाळ, ग्रामसेवक त्या ठिकाणी सभामंडपाचे काम सुरू आहे. इस्टिमेट करून आणले आहे. अभिजीत शेलार यांनी काम घेतले आहे. त्या ठिकाणी पहिला सभामंडप होता. कलेक्टरच्या परवानगीला अडचणी येत आहेत; त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून ही कामे सुरू आहे.:- सुरेखा वेठेकर, सरपंच.