शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
निर्वी ( ता.शिरुर) येथे दि.23 वार गुरुवार रोजी कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन च्या वतीने ग्रामपंचायत निर्वी येथे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या बरोबर कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन च्या कामाविषयी चर्चा सत्र आयोजित केले होते. यावेळी वैशाली चव्हाण, शुभांगी मैड यांनी संस्थेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले ही संस्था शिरूर तालुक्यातील 40 गावांमध्ये काम करत आहे. मुलांच्या हक्क व आधिकरांसाठी, शिक्षण ,बालकामगार, बाल लैंगिक अत्याचार होऊ नये व मुलांसाठी बाल मित्र ग्राम निर्माण करणे या साठी काम करत असून करुणामय भारत निर्माण करण्यासाठी संस्थेने चळवळ सुरू केली आहे, त्याचे काम शिरूर तालुक्यात काम सुरू केले आहे. त्यामध्ये जिल्हा समन्वयक सुभाष गटकने, प्रकल्प आधिकरी अमोल राठोड ,वैशाली चव्हाण,शुभांगी मैड,माधुरी कोरेकर ,अनिल कांबळे, वर्षा मिसाळ, प्रतिभा जावळे, सरपंच शोभा तरटे, माजी उपसरपंच निलेश सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल वाबळे, जयसिंग सोनवणे, विलास सोनवणे, नंदकुमार सोनवणे मेजर, संपत सोनवणे,वाल्मीक सोनवणे, सचिन नलगे, पोपट कुल, प्रल्हाद सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, नामदेव सोनवणे, रमेश पवार, सलीम शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी सर्वांचे आभार ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे यांनी मानले.