किल्ले उभारणीत बालचमू मग्न.
जुन्नर प्रतिनिधी: रविंद्र भोर
माळशेज परिसरात दिवाळीची सुट्टी सुरू झाली तशी बालचमूंची किल्ल्यांची उभारणी वेगाने सुरू झाली.गल्लीबोळातून लहान गावागावात बाल– गोपालांचे किल्ले पुर्ण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सर्व मित्र एकत्र येऊन बालसेना किल्लेउभारणीत मग्न झाली आहे, तर पतंग उडविणे, विटी-दांडू, लपंडाव, किल्ले बांधण्यासाठीच जणू दिवाळीची सुटी असते,अशा भावनेने हे काम सुरू आहे.दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील नामांकित किल्ले दिवाळीत बनविणारे शिवजन्मभूमितील संकेत व सोहंम शिरसाठ बंधूंनी यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला रायगड या किल्ल्याची प्रतिकृती बांधली आहे. किल्ले बांधताना मुलांचे बारकावे, स्मरणशक्तीला दाद द्यावी लागेल. इतिहासाच्या पुस्तकातील चित्राचे अनुकरण करून त्यांनी किल्ल्यांची रचना केली आहे. किल्ल्याला आवश्यक त्या सर्व गोष्टींची तरतुदी करून सभोवताली तटबंदी, बुरूज,कमानी,सुरक्षित तटबंदीप्रवेशद्वार,पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत जाणारी,माची पायवाट,पायऱ्यांची डोंगराच्या योजनाशिवाय छावणी असे बारीक-सारीक बारकावे किल्ला उभारताना मुलांनी टिपले आहेत.उंच डोंगरासारखा आकार करून त्यावर किल्ल्याची रचना,सभोवती उंच कडे,शिवाय जंगलांचा भाग छायाही दिसून येत आहे.यामध्ये किल्ले रंगविणे,सजावट करणे,पहाऱ्याकरिता सैनिक यंत्रमानव (रोबो) दाखविला जातो.
किल्ल्यांमध्ये आधुनिकतेची जंगलात डायनासोर, अॅनाकोंडा,चंद्रयान याचा वापर काही बालमित्रांनी केलेला दिसत आहे.पूर्ण तयार केलेल्या किल्ल्यांवर दुकानात मिळणाऱ्या मातीच्या चित्रांचा व खेळण्यांचा वापर केला आहे.यामध्ये पहारेकरी,शिपाई,सैन्य यांची चित्रे लहानशा काठीवर चिकटवून प्रवेशद्वाराजवळ वेधून घेते.बुरुजावर लक्ष मातीचे सैन्य,जंगली प्राणी, प्लास्टिकची झाडे, पणत्या,नळ्याद्वारे कारंजे,विहीर, छत्रपती शिवाजी किल्ल्यावरून खाली उतरणारी, पाहणी करणारी असो अगर घोड्यावर आरूढ महाराजांची जाणीवपूर्वक ठेवलेली दिसते.महाराजांची प्रतिमा ती सिंहासनावर बैठी असोअगर उभीउपस्थिती ही बालमित्रांनी आकर्षक बनवली आहे.