आमदार बेनके यांच्या प्रयत्नांना यश.
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा, बेल्हा, वडगाव आनंद, जुन्नर, ओतूर, नारायणगाव या सहा मंडल कार्यक्षेत्रातील ८८गावांत दुष्काळादृशपरिस्थिती शासनाने जाहीर केला आहे.यामुळे या गावातील शेतकरी,विद्यार्थी यांना शासनाच्या सवलतीचा लाभ मिळणार आहे,अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.जुन्नर तालुक्यातील महसुली मंडलात जून ते सप्टेंबर २०२३ कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असून तिथे दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून तालुक्यात कमी पर्जन्यमान झालेल्या महसुलीमंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यात येणार आहे.हा प्रस्ताव आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला होता. ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलि- मीटर पेक्षा कमी झाले आहे अशा २१ महसुली मंडळां- मध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. :- या सवलतींचा लाभ-:■ जमीन महसुलात सूट ■ सहकारी कर्जाचे पुनर्गठन■ शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगित■ कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट■ शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी। ■ रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.■ आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर■ टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.