सर्व्हर अडचणीमुळे त्रस्त कार्डधारकांना दिलासा
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जेंव्हा पासून रेशनिंगचे वाटप ऑनलाईन पध्दतीने करण्याची सक्ती रेशनिंग दुकानदारांना करण्यात आली तेंव्हापासून सर्व रेशनकार्ड धारकांना रेशनिंग वरील सर्व धान्य वस्तू आणि आनंदाचा शिदा मिळणे सोयीचे झाले परंतु यामध्ये खरी अडचण आली ती म्हणजे सर्व्हर डाऊनची कारण ई-पॉस मशीनवर रेशन लाभधारकाचा थम (अंगठा) घेतल्याशिवाय वस्तू देणे शक्य होत नाही आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वाटप सुरू झाली की सर्व्हर डाऊन होतातच परिणामी लाभधारक व दुकानदार यांच्यात विनाकारण शाब्दिक वाद निर्माण होत आहेत.
याबाबत अनेक तक्रारी पुरवठा विभागाला करण्यात आल्या आहेत याच्यावर उपाय त्वरित करणे शक्य होत नाही कारण ई-पॉस मशीनचे सर्व्हर नियोजन केंद्र म्हणजे दिल्ली वरून केले जाते परिणामी दुकानदार व पुरवठा आधिकारी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो मात्र दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने देऊ केलेला आनंदाचा शिधा लाभधारकांना वेळेत मिळणार असून दि:-११ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील ज्या भागातील सर्व्हर डाऊन झाला असेल त्या भागातील रेशन दुकान चालकांनी ऑफ लाईन पध्दतीने शिधा वाटप करण्याचे आदेश पुरवठाविभागाने एका पत्राद्वारे करण्यात आले आहे अशी माहिती जुन्नर रेशनिंग पुरवठा विभागाचे अधिकारी महेश जाधव व जि. व्ही. ठाकरे यांनी दिली
यासंदर्भात दि.०३.१०.२०२३ च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधपत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा संच ई-पॉस प्रणालीद्वारे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच दि:- १९.१०.२०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सदर शिधासंच वितरीत करण्याकरीता दुकान मालकांनी अनुसरावयाची कार्यपद्धती पुढील ठरविण्यात आली आहे.आनंदाचा शिधा संच वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करताना राज्यातील काही जिल्ह्यांकडून तांत्रिक अडचणी येत असल्याचे कळविले आहे सदर बाब विचारात घेता,पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधासंचांचे वितरण दिवाळीपूर्वी होण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी,अन्न वितरण अधिकारी,उपनियंत्रक, शिधावाटप यांना सदर शिधा संचांच्या वितरणाबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
१) ज्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा सुरळित सुरू आहे, त्या ठिकाणी शिधासंचांचे वितरण ऑन- लाईन पद्धतीने करावे.२) ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन शिधा संचांच्या वितरणास वेळ लागत आहे,अशा ठिकाणी दि:-११.११.२०२३ पासून ते दि:-१५.११.२०२३ पर्यंत शिधा संचांचे वितरण ऑफलाईन पद्धतीने करावे.परंतु दि:- १६.११. २०२३ पासून शिधा संचांचे वितरण ऑनलाईन पद्धतीनेच करावे.३)शिधासंचांचे ऑफलाईन वितरण करताना रास्तभाव दुकानदारा विक्री नोंदवहीमध्ये शिधापत्रिकाधारकाचे नाव,शिधापत्रिका क्रमांकातील शेवटचे ४ नंबर, मोबाईल क्रमांक,लाभधारकाची सही इ.तपशिल नमूद करावा ४) ज्या पात्र शिधापत्रिका- धारकांना शिधा संचांचे ऑफलाईन वितरण करण्यात आलेले आहे,अशा शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकरण करुन ऑनलाईन नोंद घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.