जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
दिवाळीची सणसुदी आनंदाने साजरी करण्यासाठी रेशन कार्ड धारकांना राज्य शासनाने आनंदाचा शिधा वाटण्याचे आदेश दिले आहे त्याला अनुसरून तहसील व अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी गावा गावांमधील स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधा दिवाळीच्या आधीच पोहोच केला आहे परंतु या शिद्याला सर्वर डाऊन चे ग्रहण लागले असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांकडे आनंदाचा शिधा उपलब्ध असल्याचे कळताच रेशन कार्ड धारक दुकानासमोर सकाळपासूनच गर्दी करत आहे परंतु गेली चार-पाच दिवसांपासून सतत असलेल्या सर्वर डाऊन मुळे ग्राहक आणि दुकानदारांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक रंगत आहे त्यामुळे ग्राहकांबरोबर दुकानदारांना देखील मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे दुकानांमध्ये आलेला आनंदाचा शिधा घरी न्यायचा कधी आणि गोडधोड दिवाळी करायची कधी असा प्रश्न ग्राहक विचारत आहे.
स्वस्त धान्य दुकानाकडे गेली चार दिवसांपासून आनंदाचा शिधा नेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे सर्वर डाऊन असून पावती निघत नसल्यामुळे पुन्हा माघारी परतावे लागत आहे अशा घटना दरवेळी घडत असल्यामुळे शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे अशी तालुक्यातील सर्वच रेशन धारकांना अपेक्षा व्यक्त केली आहे.