प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय फिनिक्स प्रेरणा गौरव पुरस्कार पाबळ ग्लोब इन्फोटेक कम्प्युटर सेंटरचे संचालक दत्तात्रय गुंजाळ यांना सायन्स पार्क ऑडिटोरियम पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणी महिला सेवाभावी संस्था नाशिकच्या संस्थापिका डॉ.सुनिताताई मोडक होत्या,, कार्यक्रमाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी,प्रसिद्ध व्याख्याते व सुप्रसिद्ध लेखक प्रकाश कदम,ढोकसांगवीचे उपसरपंच डॉ.योगेश मलगुंडे तसेच आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक,पत्रकार डॉ.विक्रम शिंगाडे उपस्थित होते.
पर्यावरण तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल गुंजाळ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजातील उपेक्षित,वंचित महिलांसाठी कल्याणी सेवाभावी संस्था कार्यरत असून आपण सर्वांनी समाजातील या घटकांसाठी अधिक प्रेरणेने काम करण्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी कल्याणीताई मोडक यांनी केले.
निवृत्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी म्हणाले की वेगवेगळ्या क्षेत्रात आपण जे काम करत आहात त्याचाच हा गौरव आहे समाजाला सकारात्मक दृष्टिकोनाचा संदेश देऊन आणखी पुढे नेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या पुरस्कार वितरणा सोहळ्यासाठी राज्यभरातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.प्रीती कोळी या़ंनी तर आभार डाॅ.विक्रम शिंगाडे यांनी मानले.