जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
जुन्नर तालुक्याच्या उत्तर पश्चिम पट्ट्यातील, सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून मांडवी नदीचे खोरे आणि बरडीनाथ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या फोफसंडी कोपरे,मांडवे,मुथाळणे,जांभुळशी तसेच माळशेज घाट परिसरात, हरीचंद्रगडाच्या संपूर्ण अंगाखांद्यावर तब्बल ७ वर्षांनी कारवीच्या फुलांनी बहरून गेली आहे. यावर्षी कारवीला पूर्णपणे फुलांचा बहर आल्यामुळे सर्व डोंगररांगा जांभळ्या रंगाने भरून गेल्या आहेत. कारवीचा बहर जेंव्हा फुलण्यास सुरुवात होते तेंव्हा आगळावेगळा पुष्पोत्सव असतो.डोंगरउतांवर व मुरमाड मातीतून ट्रेकर्सना तोल सांभाळण्यासाठी याच कारवीच्या झाडांची मदत होते.कारवीमुळे वारा आणि पावसामुळे होणारी जमिनीची धूप आटोक्यात येते. तसेच,पाण्याचा जमिनीतील पाझर वाढवून भूजलस्तर वाढविण्यास हातभार मिळतो.अनेक प्रकारची फुले, कारवीच्या दाट जाळीच्या आश्रयाला वाढतात.या फुलांमधे भरपूर पराग आणि मध मिळत असल्या मुळे मधमाश्या या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच डेरा देऊन बसतात आदिवासी लोक हा कारवीच्या फुलांचा मध गोळा करतात.हा मध आयुर्वेदिक असल्याने औषधीगुणधर्म प्रमाणित असते कारवीच्या काड्यांचा वापर कुडाचे घर बांधण्यासाठी करतात.हिची पाने विषारी आणि खाण्यासाठी अयोग्य असली तरीही खेडोपाड्यांत व आदिवासी जमातीमध्ये या पानांच्या अर्काचा उपयोग पारंपरिक औषधी म्हणून दाहविकार जाळणे,पोळणे तसेच पोटाच्या आजारांच्या उपचारासाठी केला जातो. बहर ओसरला की कारवीची बोडे सुकू लागतात.बोंडा मधील बिया पक्व झाल्या की जीवनचक्रातील पुढील महत्वाची आपली जबाबदारी पूर्ण केलेली ही झाडे सात-आठ वर्षांची तपश्चर्या पूर्ण करून आपला जीवन काळ संपवतात जून महिन्यात पहिल्या पावसाच्या सरीच्या माऱ्याने ही बोन्ड तडतड आवाज करीत फुटतात आणि त्या आतील बिया दूरवर भिरकावल्या जातात आणि त्यापासून तीची नवीन रोपे फुटतात””कारवीची झाडे ७ वर्षे वाढतात आणि ८व्या वर्षी सर्व झाडे एकाच वेळी फुलतात.एकत्रित बहरामध्ये इतक्या बीया विखुरल्या जातात.काही बिया कीटकांच्या भक्ष स्थानी पडल्या, अनेक बिया पुन्हा पावसाळ्यात रुजतात तरी हाच फंडा नैसर्गिकरित्या सृष्टी चक्र पुढं जंगल वाढण्यास मदत होते.आपनी जसे दुष्काळ यामुळे वैभव काकडे,(वनपरिक्षेत्र अधिकारी,ओतूर)सध्या सह्याद्रीच्या कुशीत मोठ्या प्रमाणावर कारवी फुलांनी बहरल्याने अनेक आदिवासी तरुणांना उत्तम मधमाशी पालन हा व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झाली असून याच भागातील मेंगाळवाडी ता:- जुन्नर येथील आदिवासी तरुण शांताराम वारे याने आपल्या माळशेज फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत यांचा मधमाशी पालन प्लांट कारवी फुलोरा असल्याने त्या वर चालू केला असून त्याद्वारे कारवी फुलांपासून मिळणाऱ्या आयुर्वेदिक मध विक्री करण्यास सुरुवात केलीआहे.