भाजपा कामगार आघाडीचे रघुनाथ आंबेडकर यांनी 30 ऑक्टोबरपासून उपोषणाचा दिला इशारा.
जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पिंपळगाव जोगा धरणातील डाव्या कालव्यातून कान्हूर पठार सिंचन योजनेद्वारे पिण्या- साठी व सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी भाजप कामगार आघाडीचे पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधा- कृष्ण विखे पाटील व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच पालकमंत्री यांनी कान्हूर पठार सिंचन योजद्वारे दुष्काळी गावांना पिण्यासाठी व सिंचनाकरिता पाणी देण्याबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा सोमवार दि:-३० ऑक्टोबर पासून कार्यालया समोर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी, विरोली, कान्हूरपठार, गोरेगाव, जामगाव, वडगाव आमली, भांडगाव, किन्ही,करंदी, निमगाव घाणा आदी गावातील शेतकरी पिढ्यांनपिढ्या दुष्काळी परिस्थितीत जगत आहेत. शेतकऱ्यांची पाण्या अभावी हेळसांड होत असून, पठारी भागातील सुपीक जमीन केवळ सिंचन अभावी कोरडवाहू बनलीआहे.शेतकऱ्यांच्या युवा पिढीला शहराकडे स्थलांतरित व्हावे लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी कर्जापोटीआत्महत्या देखील केलेल्या असून,ही अतिशय गंभीर व चिंताजनक बाब आहे. येथील पिंपळगाव जोगा धरणातीलडाव्या कालव्यातून कान्हूर पठार सिंचन योजनेद्वारेपिण्यासाठी व सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाल्यास या गावातील दुष्काळी परिस्थि ती हटणार असल्याचेआंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.या प्रश्नावर पालकमंत्री विखे यांच्याशी यापूर्वीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी तातडीने जलसंपदा विभागाला कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे.मात्र त्यावर अद्यापिकार्यवाही झालेली नाही.यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने आनखी परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच नियोजन म्हणून पिंपळगाव जोगा धरणातील डाव्या कालव्यातून कान्हूर पठार सिंचन योजनेद्वारे पिण्यासाठी व सिंचना करिता पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनतापार्टी कामगार आघाडीचे रघुनाथ आंबेडकर यांनी केलीआहे.