जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी नेमकं काय काम करतात,ते कसं प्रभावी आहे हे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातून दिसून आले आहे.लवकरच जुन्नर तालुक्यात कीटकजन्य आजारांवर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंतकुमार गरिबे यांनी नारायणगाव (वाळवाडी) येथे दिली. महाराष्ट्र राज्याचे सहसंचालक प्रतापसिंह सारणीकर यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे आणि जुन्नरच्या कर्तव्यदक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि तालुका आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे यांचे विशेष प्रयत्नातून तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रा.आ.केंद्र,वारूळवाडीच्यासभागृहात पार पडला.यावेळी मार्गदर्शन करताना हेमंतकुमार गरिबे बोलत होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ,जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचेआरोग्य सहायक आनंद कांबळे,शौकत इनामदार,सचिन राखुंडे परीक्षक म्हणन जयहिंद इंटरनॅशनल स्कूलचे मुख्या- ध्यापक डॉ. किरण पैठणकर व त्यांची परीक्षक टीम तसेच तालुक्यातील सर्व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व आरोग्य सेवक वैभव सहाणे,तालुका प्रतिनिधी म्हणून जयदेव रावते, राजेश शेरकर,रेश्मा जाधव तर शीतल कोकाटे,चेतना भावसार,भारती माळी,अश्विनी डोके आदी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,तालुक्यातील सर्व गटप्रवर्तक,आशा सेविका,आरोग्य सेवक व सहायक उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप कचरे यांनी केले.आरोग्य सेवक नरेंद्र देठे यांनी आभार मानले. यावेळी सोमतवाडी येथील आश्रमशाळेच्या पार्वता विठ्ठल लांडे,न्यू इंग्लिश स्कूल,शिरोलीच्या गौरी संतोष जाधव,मॉडर्न इंग्लिश स्कूल,बेल्हे येथील मनस्वी प्रतीक गुंजाळ,हिंदमाता विद्यालय,पिपरी पेंढार तर आशा स्वयंसेविका गटातून उंडे खडक येथील निकिताकृष्णा शेळके, बेल्हे येथील अनिता बाळासाहेब बांगर,नेतवाड येथील अश्विनी गायकवाड,मांजरवाडी येथील राजश्री थोरात यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. –:८३५ जणांनी घेतला निबंध स्पर्धेत भाग:–तालुक्यातील ३१ विद्यालयांतून आणि तालुक्यातील १०२ आशा स्वयंसेविकांचे मिळून ८३५ निबंध स्पर्धेत होते. शालेय विद्यार्थी गटातून गुरुवर्य रा. प. सबनीस, नारायणगाव येथील आराध्या बाळासाहेब चौधरी व शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, जुन्नर येथील गौरी संदीप शेलार यांनी तर आशा स्वयंसेविका गटातून उदापूर येथील पूजा राहुल घोडेकर व बल्लाळवाडी येथील मंगल अंकुश डोंगरे आदींनी अनुक्रमे विद्यार्थी व आशा गटात विभागून प्रथम क्रमांक पटकावला. तर विद्यार्थी गटातून माही संजय भोर व श्रवणी गणेश बेलवटे, आशा गटातून पिपरी पेंढार येथील संध्या शांताराम अभंग व राजुरी येथील रोहिणी संदीप जाधव यांनी द्वितीय क्रमांक तर विद्यार्थी गटातून कुरण येथील जयहिंद इंटरनॅशनल स्कूल येथील समीक्षा प्रवीण गव्हाणे आणि गौरी सचिन गाडये, आशा गटातून निमगाव सावा येथील मिनाज रियाज पटेल व मांजरवाडी येथील मनीषा मच्छिंद्र गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला.