निर्वी प्रतिनिधी: शकील मनियार
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक शिक्षकेतर लोकशाही आघाडी संलग्न माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संस्था शिरूर हवेली यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सरदवाडी येथील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण गोरडे यांना प्रदान करण्यात आला शिक्षण विभागाचे अवर सचिव किसनराव पलांडे,शिक्षण सहसंचालक हरून अत्तार, लातूरचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे,पुण्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे,लोकशाही आघाडीचे प्राचार्य जी के थोरात,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,सचिव किशोर पाटील,तज्ञ संचालक गुलाबराव गवळे,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके ,कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे,सचिव मारुती कदम,माध्यमिक शिक्षक संघाचे वसंतराव ताकवले ,कलाध्यापक व आदर्श पत्रकार प्रवीणकुमार जगताप, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रा जितेंद्रकुमार थिटे,गणित विज्ञान अध्यापक संघटनेचे संभाजी ठुबे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संस्था शिरूर हवेलीचे उपाध्यक्ष संदीप जगताप,नितीन माने, सुरेखा डोईफोडे ,अरुण सातपुते ,रामदास रेटवडे ,सतीश बनकर ,महेश धुमाळ, राजाराम ढवळे ,प्रशांत साकोरे उपस्थित होते. शिक्षणा व्यतिरिक्त समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व प्रशासनातील उच्च पदावर काम करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान देखील संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आला ह्या संपूर्ण देखण्या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्था शिरूर हवेलीचे अध्यक्ष शिक्षक नेते सोमनाथराव भंडारे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राचार्य अनिल साकोरे यांनी तर आभार रावसाहेब थोरात यांनी मानले.