निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ व पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2033. 24 या शैक्षणिक वर्षातील शिरूर तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार गेली 30 वर्ष उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयातील श्री नितीन बाळकृष्ण मिसाळ यांना पुणे विभागीय शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर साहेब व शिरूर तालुक्याचे माजी आमदार तसेच श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव म्हाळुंगी संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत काका पलांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्याधाम प्रशाला शिरूर येथील सांस्कृतिक हॉलमध्ये संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमास शिरूरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी मॅडम, पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी श्री बाळकृष्ण कळमकर साहेब, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री तुकाराम बेनके, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री मारुती कदम तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, श्री सूर्यकांत पलांडे, निर्वी गावचे माजी आदर्श सरपंच तात्यासाहेब खंडेराव सोनवणे, व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विष्णू करपे यांनी श्री नितीन मिसाळ यांचे अभिनंदन केले.