निर्वी प्रतिनिधी :शकील मनियार
भारतासारख्या प्राचीन आणि भक्तीची परंपरा असलेल्या देशात नवरात्र म्हटले की आदिमाया आदिशक्तीचा,दुर्गा देवीचा,तुळजापूरच्या भवानी देवीचा, माहूरच्या रेणुका मातेचा,कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा,वणीच्या सप्तशृंगी देवीचा,बंगालच्या कालिकामातेचा नऊ दिवस मोठ्या भक्तीभावाने संपूर्ण महाराष्ट्रभर जागर केला जातो देवी शब्द उच्चारला की आपल्यासमोर देवीची विविध रूपे येतात त्यातील काही उग्र तर काही सौम्य स्वरूपाची आहेत रामायण महाभारत नवनाथ भक्ति कथासार अशा ग्रंथाचा अभ्यास केल्यास असे दिसते की त्या ग्रंथांमध्ये देवीची उमा पार्वती जगदंबा भवानी गौरी दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा सप्तशृंगी अशी कितीतरी नावे आलेली आहेत तीच देवीची रूपे आहेत जेव्हा जेव्हा देव देवतावर संकट आली तेव्हा तेव्हा देवीने उग्ररूप धारण करून संकटाचा सामना केलेला आहे थोरां मोठ्या कडून कथा कविता मधून अभंग ओव्यातून कीर्तन प्रवचनातून नाटके चित्रपटातून दूरदर्शन मालिका मधून आपण हे बघितले आहे बघतो आहोत. निमोणे ता शिरूर जि पुणे येथील नवजीवन वनवा प्रतिष्ठानच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर करत नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होत आहे ग्रामीण भागातील स्त्रीयां वर्षभर शेतीक्षेत्रात प्रचंड श्रम करून काळ्या आईची सेवा करत असतात जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला बरोबरीने मदत करीत असतात.श्रद्धेबरोबरच थकलेल्या बळीराजाला त्याच्या अर्धांगिनीला एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन या नवजीवन व वनवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येते देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम,मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती,सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांचे विविध कार्यक्रम,मनोरंजनाचे विविध कार्यक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर पतके,श्रीकांत दुर्गे ,सोमनाथ ढगे ,मनोज मूर्तीमोडे, गोरक्ष चौगुले ,अजय पोटे, सागर जाधव, विशाल जगदाळे, मार्गदर्शक प्रकाश दुर्गे सर तसेच अनेक महिला भगिनींच्या माध्यमातून नवरात्रचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो