जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट राजुरी संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र(आय टी आय),बेल्हे येथे शारदीय नवरात्रौत्सव व खंडेनवमी- निमित्त भारतीय परंपरेनुसार यंत्र पूजन व शस्र पूजन करण्यात आले.संकुलातील आय टी आय विभागा बरोबरच इंजिनीअरिंग,पॉलिटेक्निक,एमबीए,ज्युनियर कॉलेज,बीसीएस,गुरुकुल,फार्मसी,लॉ,बीबीए,बीसीए,एमसीए,एम सी एस,समर्थ टाटा मोटर्स,समर्थआयुर्वेदिक हॉस्पिटल,विभागीय प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र आदी सर्वच विभागांमध्ये ही यंत्र औजारे यांची पूजा मोठ्या आनंदाने व विधिपूर्वक करण्यात आली. ह.भ.प.बळवंत महाराज औटी यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने व यंत्र पूजन करून खंडेनवमी साजरी करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉधनंजय उपासनी,उपप्राचार्य विष्णू मापारी ,गोरक्ष हाडवळे,रमेश औटी,गणेश हाडवळे,रामदास सरोदे,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,फार्मसी चे प्राचार्य डॉ. बसवराज,डॉ.संतोष घुले पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रा.संजय कंधारे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय धर्मपरंपरेनुसार नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो.खंडे नवमीला यंत्र, औजारे,शस्रपूजन केले जाते.वैद्य डॉक्टरांपासून ते अगदी सोनार लोहार असे पारंपारिक व्यवसायातील लोक दररोजच्या उपयोगात शस्रांची पूजा केली जाते.साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी खरेदी,नवे करार,नव्या योजनांचा प्रारंभ इ.चांगल्या गोष्टीची सुरुवात केली जाते.घर,गाडी,बंगला खरेदी केला जातो.सोन्या चांदीचे दागिने केले जातात.नवे व्यवसाय चालू केले जातात.नवी नाटके,चित्रपट यांचे मुहूर्त होतात.पुस्तके प्रकाशित होतात. सर्व विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी व उपस्थित मान्यवरांनी यावेळी यंत्र अवजारे व शस्रांची पूजा केली.यंत्रासमोर आकर्षक अश्या आणि ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या बोलक्या रांगोळ्यांनी मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.स्त्री भ्रूण हत्या,व्यसन मुक्ती,शेतकरी आत्महत्या,भ्रष्टाचार,स्वच्छता अभियान,पर्यावरण संतुलन आदी विषयांवर आधारित रांगोळ्या,संदेश देणारे संदेश फलक यामुळे खऱ्या अर्थाने खंडे नवमी साजरी झाल्याचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे म्हणालेमाऊलीशेठ शेळके म्हणाले की,यंत्र ही साधना असून यंत्राचे तंत्र लक्षात घेऊन फक्त आजच्याच दिवशी नाही तर वेळोवेळी या यंत्रांकडे लक्ष देऊन त्याची निगा राखली तर यंत्राचे तंत्र आपल्याला जीवनात एक नवीन मंत्र देऊन जीवन अधिक सुसह्य करण्यात मदत करतील.आय टी आय व कार्यशाळेतील सर्व निदेशक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले सर्व उपस्थितांचे आभार आय टी आय चे उपप्राचार्य विष्णू मापारी यांनी मानले.