जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आणि ओतूर गावचे भूषण स्व.श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ यांचा ५० वा स्मृतिदिन उद्या शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता ओतूर येथील चैतन्य विद्यालयाच्या नूतन इमारतीमध्ये होणार आहे अशी माहिती ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिलशेठ तांबे यांनी दिली.
यावेळी स्व.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे भूषण पुरस्कार, स्व.मा.आ.श्रीमती लताबाई (नानी) तांबे भूषण पुरस्कार,मानपत्र, मानचिन्ह प्रदान सोहळा व विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी आमदार दिलीपराव ढमढेरे,बाळासाहेब दांगट,शरददादा सोनवणे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकरकाका तांबे, राजेंद्र डुंबरे,सचिव प्रदीप गाढवे,सहसचिव पंकज घोलप व खजिनदार रघुनाथशेठ तांबे यांनी संयुक्तपणे सांगितले.
शनिवारी सकाळी आठ वाजता ग्रामविकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत स्व. आमदार झांबरशेठ तांबे व मा.आमदार स्व.लतानानी तांबे यांच्या प्रतिमांची सालाबादप्रमाणे ओतूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर आयोजित केलेल्या समारंभामध्ये शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांना कै. आ.श्रीकृष्ण रामजी तांबे भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असून या वर्षीपासूनच समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका महिलेस मा.आ. स्व.श्रीमती लतानानी श्रीकृष्ण तांबे भूषण पुरस्कार देण्यात येणार असून या वर्षीचा पुरस्कार लोणावळा येथील निर्मिती फाउंडेशनच्या संस्थापक आजीवन अध्यक्षा डॉ.सौ सीमा सुभाष पानसरे शिंदे यांना खासदार डॉ.अमोल कोल्हे – यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अनिलशेठ तांबे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी पुणे येथील बार्टीच्या समाजकल्याण उपायुक्त इंदिरा अस्वार डावरे,पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, पांडुरंग पवार,शरद लेंडे, सुदर्शन केमिकल्स प्रा.लि.चे उपाध्यक्ष रमेश डुंबरे,विघ्नहर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे,माजी संचालक विलास आप्पा दांगट, खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, जेष्ठ नेते अनंत चौगुले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले,पंचायत समितीचे माजी सभापती विशाल तांबे,पुणे येथील श्री महालक्ष्मी लँडमार्कच्या सौ सुजाता कुलकर्णी ओतूरचे सरपंच प्रशांत डुंबरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतूरकर, गजानन महाराज शिक्षण संस्थेचे सचिव वैभवशेठ तांबे, श्री गाडगे महाराज मिशनचे संचालक नितीन पाटील ,सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. सर्जेराव गाढवे,श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे मा.सचिव जी. आर.डुंबरे,ओतूरच्या माजी सरपंच गीतांजली पानसरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे अनिलशेठ तांबे यांनी सांगितले.