जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
(नक्षत्राचं देणं काव्यमंचचा अभिनव स्तुत्य उपक्रम)
नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने दरवर्षी ९ ऑक्टोबर हा “जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. सर्व महाराष्ट्रात आपल्या जवळील पोष्ट ऑफिस मध्ये जाऊन सर्व पोष्ट कर्मचारी वर्गाचा गुलाबपुष्प अथवा आपल्या जवळील पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दरवर्षी दिल्या जातात हे राष्ट्रीय कर्तव्य केले जात आहे. नक्षत्राचे देणे काव्यमंचवतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शाखेतून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
जुन्नर पोष्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी वर्गाचा सत्कार करताना सबपोष्टमास्तर जयश्री जाधव म्हणाल्या की,अशा सामाजिक संस्थेच्यावतीने आमचा सन्मान म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम करत असल्याची पावती आहे.सर्व पोष्ट कर्मचारी आपली कामे जबाबदारीने करत असतात या माध्यमातुन पोष्टाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मदत होते.यावेळी नक्षत्राचं देणं काव्यमंचचे जुन्नर शहर प्रमुख कविवर्य यशवंत घोडे सत्कार करताना म्हणाले, पोष्टाचे आणि काव्यमंचचे अनेककामानिमित्त जवळचा स्नेह आहे.नेहमीच पोष्टातील कर्मचारी वर्ग नागरिकांना पोष्टाच्या सुविधा विनम्रपणे देताना दिसतात. संस्थेने अनेक वर्ष पोष्ट कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवलेले आहे.
यावेळी सर्व कर्मचारी वर्गास गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सबपोष्ट मास्तर जयश्री जाधव व पोष्टल असिस्टंट अशोक दगडे,उंबरे, राक्षे,एमपीएस म्हणून सौ.कवडे तर पोस्ट मास्तर शिराळसेट, कामटकर, दिलीप सावंत,तसेच पोस्ट कर्मचारी इ.चा सत्कार नक्षत्रांचे देणे काव्यमंच जुन्नरचे शहर प्रमुख कविवर्य यशवंत घोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.