फोफसंडीत काजवोत्सव, जलोत्सवानंतर पुष्पोत्सवाची निसर्गप्रेमींसाठी पर्वणी.
(फोफसंडीत निसर्गप्रेमी पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या रानफुलांचा पुष्पोत्सव सुरू)

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या आदिवासीबहूल अकोले तालुक्याची ओळख म्हणजे निसर्गरम्य पर्यटन केंद्र आहे. त्यामुळे राज्यभरातून अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, कळसूबाई वन्यजीव अभयारण्यातील कळसूबाई, रतनवाडी,घाटघर, सांप्रद व फोफसंडीत निसर्गप्रेमींच्या पर्यटनात वाढ होत आहे. हे पर्यटक पूर्वपावसाळ्यात रात्रीच्या काळोखात चमचम करणारा काजवोत्सव,उंच कातळ- कड्यावरून धोधो कोसळणारे पावसाळ्यात धबधबे आणि आता पावसाळ्यानंतर निसर्गप्रेमींच्या रानफुलांचा पुष्पोत्सव फोफसंडी व हरिश्चंद्रगडावर सुरू झाला असून तो अनुभवण्यास पर्यटक व निसर्गप्रेमी गर्दी करतात.
अकोले तालुक्यातील फोफसंडी,हरिश्चंद्रगड,भंडारदरा, विश्रामगड,घाटघर,रतनवाडी,कुंजीरगड,साम्रद,मांडवी नदीचा उगम यांसह कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात पावसाळ्यानंतर सर्वदूर रंगीबेरंगी फुलांच्या गालिच्यांमुळे टेकड्यांवर झळाळी लाभली.पावसाळा संपायच्या शेवटच्या टप्यात येथे पुष्पोत्सव सुरू होतो.रानावनात डोंगरमाथ्यावर,दऱ्याखोऱ्यात सप्टेंबर महिन्यानंतर रान फुलांचा गालिचा येथे फुलला असून फुलांचे हे बहर मधमाश्या, फुलपाखरे,भुंगे फुलांना बिलगण्यास आतूर होतात. यानिमित्त आता फोफसंडीत सर्वदूर रंग,गंध,फोफसंडी येथे फुलले दुर्मिळ रानफुले पर्यटकांना आकर्षित करताहेत.निळाई व हिरवाई येथे बहरली. येथील विविध फुलांना व फुलपाखरांना वेगळाच सुगंध लाभला.
हळदीकुंकू आभाळी,नमाळी, सोनकडी (सोनकी),कळलावी (अग्निशिखा),कंदील फूल,पांढरा साप कांदा,रानहळद,हबेआमरी पाचगणी हबेआमरी ठिपके, हमाना,रामतूर रानतेरडा, रामगांजा,स्वेतांबर,मंजिरी सफेद कोरांटी,खुरासनी,तरवड, सोनसरी,मंजिरी,कुसुंबी,उंदरी, पावटी,मोहिनी घालणारे दुर्मिळ रानफुल,लाजाळू,लाल गोधडी, घाणेरी,गरिया,कोंबडा अशी नानाविविध प्रकारची फुले इथे पहायला मिळत आहेत. सद्यस्थितीत कारवीची निळाई व सोनकीची (सोनकडी) पिवळसर छोटी फुले जास्त प्रमाणात पहायला मिळत आहेत.धबधबे हळुवार प्रवाहित असून शांत झाले आहेत,परंतु आता फुलोत्सव सुरू झाला. पर्यटकांसह निसर्गप्रेमींना फुलोत्सव खुणावत आहे.दोन आठवड्यांपूर्वीच फोफसंडीत व करण्यासाठी इथे येतात.

-:(सूर्योदय ८.४५ वाजता, तर सूर्यास्त ५.30 वाजता):-
अकोले ते कोतूळमार्गे फोफसंडी हे अंतर ४०.७ किलोमीटर आहे तर जुन्नर तालुक्यातील उदापुर ते कोपरे मार्गे फोफसंडी हे अंतर २७ कि.मी.असून अलीकडेच रस्ता सुंदर काम करून पर्यटनाला चालना देण्यासाठी योगदान दिले आहे.पळसुंदे व फोफसंडी ग्रूप ग्रामपंचायत असून लोकसंख्या १२०० आहे.फोफसंडी व
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यास ऊनपावसाचा लपंडाव सुरू होता. पण आता पाऊस थांबला. ट्रेकर्स मंडळी भटक्यांची पंढरी मानतात. फोफसंडीत ” मध मोहोत्सव” भरवण्यात येतो.वनस्पतीशास्त्र शाखेचे विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी फुललेल्या रंगीत रंगीत फुलांचा व दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी येथे येतात.

:(जंगलात फिरा, परंतु जपून):-

  फोफसंडीत वा कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यातील कोणत्याही गावात आल्यावर घाईघाईत रानावनात घुसून रानफुलांचा मोह आवरता ठेवा.कारण या जंगलात काही वनस्पती शरीरास त्रासदायक ठरू शकतात.यामध्ये रामेठा या झुडपात हात जरी लागला,तर तुमच्या अंगावर जागोजाग सूज येऊ शकते.काही तुरळक वनस्पती इथे आहेत,जी चुकून तोंडात गेली,तर दात निखळून पडतील,असा इशारा येथील जाणकारांनी दिला.           

:(सूर्योदय ८.४५ वाजता, तर सूर्यास्त ५.30 वाजता):-
अकोले ते कोतूळमार्गे फोफसंडी हे अंतर ४०.७ किलोमीटर आहे तर जुन्नर तालुक्यातील उदापुर ते कोपरे मार्गे फोफसंडी हे अंतर २७ कि.मी.असून अलीकडेच रस्ता सुंदर काम करून पर्यटनाला चालना देण्यासाठी योगदान दिले आहे.पळसुंदे व फोफसंडी ग्रूप ग्रामपंचायत असून लोकसंख्या १२०० आहे.फोफसंडी गावातील सरपंच ग्रामपंचायतीवर आहे. फोफसंडी गाव कोतूळपासून जवळ आहे.चारही बाजूंनी उंच पर्वतांनी ते वेढलेले आहे.म्हणून येथे सकाळी ८.४५ ते ९ वाजता सूर्योदय होतो तर ४:३० ते ५.३० वाजता सूर्यास्त होत असल्याने दिवस सहा ते आठ तासांचा असतो.कोतूळ,अबीरखिंड, बहिरोबा (पळसुंदे ) मार्गे २५ किलोमीटर अंतर आहे. फोफसंडीचा परिसर म्हणजे जम्मू काश्मीरची आठवण करून देत आहे पर्यटकांना हे ठिकाण नेहमीच खुणावते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button