निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
दहीहंडी निमित्त अक्षर मानव संघटना . पर्यावरण मित्र बहुउदेशीय संस्था भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुताई सपकाळ यांच्या माई छात्रालय शिरूर येथील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण मित्र , माणूस म्हणजे काय? या दोन विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या सर्वच विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. सदर कार्यक्रमा नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी डॉ संतोष पोटे. यांनी अंधश्रद्धा निर्मूलन यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच पत्रकार नितीन बारवकर व पत्रकार प्रवीण गायकवाड यांनी वर्तमान पत्रा बद्दल माहिती दिली. मुलांना प्रेस दाखविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी पर्यावरण प्रेमी निमोणे गावाच्या आदर्श माझी सरपंच जिजाताई दुर्गे , देवदैठण च्या सरपंच कवठाळे ताई, आरोग्य सेविका मोरे ताई, तरडोबा वाडीच्या सरपंच धनश्री ताई मोरे. नगरसेविका वाटमारे ताई व डॉ सुनीता पोटे मॅडम , पत्रकार धुमाळ भाऊ , रासकर ताई , आशाताई गुंड, यांनी उपस्थिती लावली . सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .व सर्वांनी पुन्हा येण्याचे आश्वासन दिले. छत्रालयातील विनू भाऊ सपकाळ सर, व माई. ची मुलगी शुभांगी सपकाळ, यांनी. छान नियोजन केले. संपूर्ण मीरा नर्सिंग होम ची टीम उपस्थित होती.पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारतचे संस्थापक अध्यक्ष देव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.