शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
अक्षर मानव महिला संमेलन दिनांक 25,26,27 एप्रिल तीन दिवस राळेगण सिद्धी येथे मोठ्या उत्साहात संप्पन झाले. राही फौंडेशन च्या डॉ सुनीता पोटे व. डॉ संतोष पोटे य संपूर्ण अक्षर मानव आजीवन सदस्य यांनी अतिशय सूत्रबद्ध आयोजन केले. महाराष्टातून अनेक महिला संघटन करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातून विचारवंत महिलांनी सहभाग घेतला 3 दिवस महिलांनी माहेरपण उपभोगल्याचा आनंद घेतला विशेष म्हणजे हे संमेलन निशुल्क होते.

भारताचे संविधान म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करत महिलांच्या अनेक गंभीर विषयांना या संमेलनात मांडले गेले व त्यावरील उपाय योजना यांचा उहापोह करण्यात आला अक्षर मानव संघटनेची संकल्पना ज्यांच्या विचार धारेतून उदयास आली असे प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी महिलांना रूढी परपंरा यातून बाहेर पडा व तुमचे स्त्री असणे हे खूप सुंदर आहे व तिचे माणुसपण होणे महत्वाचे आहे तिच्यातील निखळ माणूस होऊन जगणे फार सुंदर आहे ते छान जगा असा सल्ला दिला मातृत्व व वंशाचा दिवा यावर डॉ सुनिताताई पोटे यांनी महिलांना खूप छान मार्गदर्शन केले तसेच संगीताताई नरके यांनी स्त्रियांवरील खरे गंभीर वास्तव याची खूप सुरेख मांडणी केली हर्षदाताई पिलाने, स्वाती ताई मापारी व अरुणभाऊ मापारी यांनी स्त्रियांची फसवणूकीचे ठिकाणे कोणती आहेत व त्यावरील उपाय यावर सर्व महिलांशी संवाद साधले. स्त्री चे व्यक्ती स्वातंत्र्य, लैंगिक शोषण, महिलांचे आर्थिक स्वावलंबन या विषयांना हात घालून त्यावर चर्चा सत्रे करण्यात आली या संमेलनात पुढील 8 कर्तबगार महिलांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन तसेच भारताचे संविधान देऊन सन्मानित करण्यात आले निवडपत्र संदर्भ 1.दुर्गा देशमाने,माजलगावसंविधान प्रचार व प्रसार2. सुमन साळवे,शिरुर मजूरांच्या मुलांचे शिक्षण व बहुविध समाजकार्य3.ज्योती धंदर,बुलढाणाप्रामाणिक पोलीस अधिकारी व महिला सबलीकरण4.प्रतिभा इराकशेट्टी, माळ मुरबाड मतिमंद मुलांची निवासी शाळा5. मीरा चंद्रकला विठ्ठल सपकाळे,कल्याण महामाया असंघटित व घरकामगार संघटना – संस्थापक अध्यक्ष 6.शर्वरी सुरेखा अरुणसमाजबंध संस्था, ‘प- पाळीचा’ द्वारे मुली महिलांमध्ये जागृती7.प्रज्ञा काटे,बारामतीबाल लैंगिक समस्या8.वृषाली माने,मुलुंडसंविधान लोकजागर परिषदराज्य भरातून अनेक विचारवंत लेखक,कवायत्री, वकील, पोलीस, डॉक्टर, काउन्सलर, समाजसेविका, गृहिणी अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बाजावलेल्या महिला राज्यभरातून उपस्थित होत्यातसेच अक्षर मानव चे. डॉ संतोष पोटे, सुजित,श्रीकांत डांगे, अजिंक्य किन्हीकर प्रवीण जावळे, जावेदा, डॉ बेंद्रे रश्मी ताई या सर्वांनी संपूर्ण महिला संमेलनास उस्फुर्त सहकार्य केले समाजसेवक अण्णा हजारें यांनीही महिलांशी मुक्तपणे संवाद साधला व. मार्गदर्शन केले असे हे अतिशय यशस्वी, सुंदर ,सुसूत्र आनंदमयी वातावरणात तीन दिवस राज्य भरातून महिलांनी सहभाग घेऊन अक्षर मानव महिला संमेलन संपन्न झाले. माणसाने माणूस मारला या सुंदर कवितेने संमेलनाचा समारोप झाला