केंद्र पातळीवरील एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत शिरूर तालुक्यात निकालाचा उच्चांक*!!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे

पिंपळे खालसा हिवरे कुंभार येथील स्वा.से.कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयाचे तब्बल ७५ विद्यार्थी केंद्र सरकारच्या एनएमएमएस व सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजू घोडके तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजारामजी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली दोन्ही शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या संख्येचा आकडा पाहता हा शिरूर तालुक्यात उच्चांक असल्याचा दावा संस्थेचे मा.अध्यक्ष सोपानराव सिताराम धुमाळ यांनी केला आहे.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे विद्यमान संचालक व कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निरंजनजी डावखरे साहेब यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल व डावखरे विद्यालयाचा शिरूर तालुक्यात उच्चांकी निकाल लावल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थी यांचे मनापासून कौतुक करून अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.एनएमएमएस या परीक्षेत ३२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे तर ४३विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.एनएमएमएस शिष्यवृत्ती मध्ये जान्हवी अण्णासाहेब धुमाळ,जयदीप कपिल गवारी,वेदांत हौशीराम इथापे,नैतिक नवनाथ म्हैत्रजकर, ऋतुजा राजेंद्र महादेवकर,संस्कार अविनाश गावडे,प्रिया नारायण चोपडी,विरेन मंगेश चव्हाण,विरेन निलेश धुमाळ,शुभदा संदीप धुमाळ,प्रज्वल राजेंद्र गावडे,ज्ञानेश नागेश नवगिरे,ओम परशुराम साळुंखे,अर्णव सचिन भोसले,स्नेहल उमेश नवगिरे,अनिरुद्ध पुंडलिक क्षीरसागर,जागृती प्रदीप परभाणे, श्रेया बापू तापकीर,अर्णव नंदकुमार भोसले,ओम प्रकाश धुमाळ,प्राजक्ता कैलास माळशिरसकर,मयूर स्वप्निल धुमाळ,संस्कार राऊत,प्रसाद विशाल धुमाळ,सृष्टी संदीप खैरे,मयूर राजेंद्र धुमाळ,लोकेश संतोष भंडारी, अनुष्का दिपक नळकांडे,राज अमीर धुमाळ,अनुष्का रमेश शेलार,रोहित दत्तूगीर गिरी,वेदिका जालिंदर थोरात या ३२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत शिवम धुमाळ,वेदिका तांबे,श्रुती पलांडे, पृथ्वी मांदळे,वेदांत तांबे,अभिषेक गांजवे,आर्यन पवार,आदित्य जगताप,सृष्टी फटांगडे,श्लोक रणपिसे,पृथ्वीराज जाधव,श्रावणी को-हाळे,सिद्धेश खैरे,सानिका लंघे, सौरभ भांगे,शुभम कोव्हाळे,समर्थ धुमाळ,कार्तिकी शितोळे,श्रावण पानसरे,आर्यन साकोरे,हर्ष धुमाळ,श्रावणी धुमाळ,श्रावणी साकोरे,राजवर्धनराजे भोसले, संस्कृती बांगर,श्रेयस साळुंखे,ऋतिक ढगे,समृद्धी उमाप,सार्थक उमाप,रिया दिवेकर,तन्मय नळकांडे, शिवानी गावडे, सुदर्शन वारे,कार्तिक टेमगिरे,साई धुमाळ,रितेश सावंत, अर्णव कदम,समर्थ खैरे,संग्राम निंबाळकर,भाग्यश्री धुमाळ,इंद्रनील खैरे,अथर्व धुमाळ व कुणाल मोढवे या ४३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य राजू घोडके,अनिल जायभाय,एनएमएमएस शिष्यवृत्ती प्रमुख मोहन बोराटे,कल्याण कडेकर,अतुल गोडे,उर्मिला मांढरे, मनोज नायकवाडी व रूपाली डफळ यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा संस्थेच्या वतीने तसेच हिवरे-पिंपळे या दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या वतीने विद्यालयाचे माजी विद्यार्थी व जॉईंट कमिशनर(जीएसटी,ठाणे)श्रीधर तानाजी धुमाळ यांचे प्रमुख उपस्थितीत व सर्व संचालकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजारामजी गायकवाड,उपाध्यक्ष दीपक जगताप,सचिव राजाराम धुमाळ,खजिनदार संपत कांतीलाल धुमाळ,कार्याध्यक्ष शहाजी बबनराव धुमाळ, वसंतराव शिर्के व संस्थेचे संचालक शामराव जनाजी साळुंखे,कुंडलिक विलासराव जाधव,आप्पासाहेब आनंदराव धुमाळ,प्रकाश दत्तोबा धुमाळ,विशाल अण्णासाहेब धुमाळ,पांडुरंग मांदळे,दत्तात्रय यशवंत धुमाळ यांचे वतीने यशस्वी विद्यार्थ्यांना पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button