सरदवाडी प्रतिनिधी: बाळासाहेब जाधव
जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रम अभियानांतर्गत प्रोत्साहन उपक्रम रांजणगाव एमआयडीसी मिटींग हॉल रिया येथे पार पडला. माननीय मुख्यमंत्र्यांचे शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत रांजणगाव एमआयडीसीतील कारखानदार यांच्या अडीअडचणी समस्या बाबत बैठक पार पडली त्यात कारखानदार यांनी त्यांच्या समस्या मांडल्या त्यास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. कार्यक्रमात कारेगाव ढोकसांगवी कर्डेलवाडी, सरदवाडी व आदी ग्रामपंचायतिचे सरपंच तसेच सदस्य उपस्थित होते. सरदवाडी गावच्या सरपंच लक्ष्मीताई जाधव यांनी सरदवाडी ग्रामपंचायत इमारत निधीबाबत व कचरा गाडी (घंटागाडी) याबाबत साहेबांकडे समस्या मांडली असता डेप्युटी सीईओ यांनी लवकरच आपला प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.तसेच कारेगाव नगरी चे उद्योजक शुभम भैय्या नवले यांनी कारेगावच्या घनकचरा व्यवस्थापनाबाबत सीईओ साहेब यांच्याकडे विचारपूस केली तसेच इतर समस्या निदर्शनास आणून दिल्या. ग्रामपंचायत सदस्य शहाजी तळेकर यांनी एमआयडीसीतील रस्ते तसेच पार्किंग यांच्या बद्दल एमआयडीसी अधिकारी यांच्याकडे समस्या मांडली कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सरपंच यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मान कारेगावच्या सरपंच वृषालीताई गवारे यांनी केला तर रिया कंपनीचे चेअरमन पाटील साहेब यांचा सन्मान सरदवाडी गावच्या सरपंच लक्ष्मीताई जाधव यांनी केला. कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी रामेश्वर राठोड साहेब, विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे,विस्तार अधिकारी ऋषिकेश गावडे, गाडीलकर साहेब,उप अभियंता एमआयडीसी मिलिंद कासार साहेब, उप अभियंता विद्युत संजय गव्हाणे साहेब, कनिष्ठ अभियंता सुभाष ठाणगे सरदवाडी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बेंद्रे,कारेगाव ग्रामपंचायतचे बिबे भाऊसाहेब, कर्डेलवाडी ग्रामपंचायतिचे शांताराम पाडळे भाऊसाहेब, कर्डेलवाडी गावच्या सरपंच लताताई कर्डिले,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गवारे ,ग्रामपंचायत सदस्य विद्याताई सरोदे, ग्रामपंचायत सदस्य उमेश सरोदे व एमआयडीसीतील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.