बहुजन मुक्ती पार्टीच्या पाठपुराव्याने अजून एका सरकारी कार्यालयातील घोटाळा प्रकरण बाहेर.
शुभम वाकचौरे
शिरूर येथील बहुचर्चित मुक्ताईनगर या रहिवासी सोसायटी मधील कारनामे थांबायचे नाव घेत नाही या आधी फसवणूक व बिल्डिंगचे नित्कृष्ट दर्जाचे कामे या मुळे ही मुक्ताईनगर सोसायटी चर्चेत आली होती. या फसवणूकी संदर्भात या आधीच हे प्रकरण कोर्टात गेले आहे.असे असताना या आधी विकसक जशी पहिल्या दिवसापासून फसवणूक करताना सरकारी खात्यातील अधिकारी यांचा वापर करून खोटे दस्तऐवज व खोट्या सह्या करून सरकारी खात्यातुन विविध परवाने मिळवतो,तसात प्रकार आता पुन्हा उघडकीस आला आहे.
मुक्ताईनगर सोसायटी मधील टाऊन प्लॅनिंग मध्ये दाखवल्या प्रमाणे व फ्लॅट विक्री करताना सदनिका धारकांना सांगितल्याप्रमाणे ज्या चार चाकी वाहन पार्किंग वरून वाद चालू होता ती पार्किंगची जागा शिवम् बिल्डर्स चे मालक मधुकर भाऊसो शिंदे,शारदा मधुकर शिंदे, विठ्ठल भाऊसो शिंदे,दत्तु भाऊसो शिंदे,रामा दत्तु होले यांनी संगनमत करून विक्री केल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी पाठपुरावा करत असताना दुसरं प्रकरण पुढे आले, शिरूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मर्यादित या सहकारी खात्याने तर कमाल केली.मुक्ताईनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या ही सोसायटी स्थापन करताना काही सदनिका धारकांना हाताशी धरून विकसक यांनी खोटे दस्तऐवज व इतर सदनिका धारकांच्या खोट्या सह्या यांचा वापर करून सोसायटीची नोंदणी केली. या बेकायदेशीर मुक्ताईनगर सोसायटीची नोंदणी करून मिळवलेल्या अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून विकसक यांनी इतर सदनिका धारकांना आठ महिन्यांत सोसायटी स्थापन झाल्याची कुठलीही कल्पना आज अखेर पर्यंत न देता सर्व ९६ सदनिका धारकांची हक्काची चार चाकी वाहन पार्किंग ची जागा विक्री केल्याचे उघडकीस आले.
बहुजन मुक्ती पार्टी चे शिरूर शहर सचिव सागर घोलप यांनी तात्काळ चौकशी करून सहाय्यक निबंधक यांना या बेकायदेशीर मुक्ताईनगर सोसायटीच्या नोंदणी बाबत विचारना केली असता सहाय्यक निबंधक यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन हात झटकण्याचे कामे केले आहे.
विकसक आणि ज्या सदनिका धारकांनी सहाय्यक निबंधक यांना हाताशी धरून खोटे दस्तऐवज व इतर सदनिका धारकांच्या खोट्या सह्या करून बेकायदेशीर नोंदणी झालेल्या मुक्ताईनगर सहकारी गृहरचना संस्था याची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी,विकसक आणि सदनिका धारक यांच्या वर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सहकार निबंधक व सहकार आयुक्त यांच्या कडे केली आहे.