प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई या शिक्षकांच्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यामध्ये गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत व केंन्द्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची सदिच्छा भेट घेऊन पतसंस्थेच्या कारभाराची माहिती दिली.मुख्यमंत्री व केंन्द्रीय मंत्री यांनी सेकंडरी पतसंस्थेचा विस्तार व कामकाजाचे कौतुक केले आणि उत्कृष्ठ कार्यास दिल्या शुभेच्छा दिल्या.

दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यामध्ये गोवा राज्यातील अग्रेसर असलेल्या थ्रिप को-आपरेटिव्ह असोसिएशन या शिखर सस्थेस भेट दिली त्यावेळी संस्थेचे व्यवस्थापक एस.एन.भगत यांनी शिखर संस्था राबवत असलेल्या योजनाची माहिती दिली.सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली.संस्थेच्या जीवनसुरक्षा ठेव योजनेंतर्गत संपूर्ण कर्ज माफी,मेडीक्लेम योजना,पर्यटन,सभासदांना कर्मवीर पुरस्कार,पाल्य मेळावा,कर्ज परतफेड, ठेवी इ.बाबत माहिती सांगीतली.थ्रिप संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर यांनी सेकंडरी पतसंस्था राबवित असलेल्या योजनाचे कौतुक केले.गोवा राज्यातील अग्रेसर पी.डब्ल्यू. डी.स्टाफ को-आपरेटिव्ह सोसायटीचे सेक्रेटरी अजय देसाई,सह सेक्रेटरी प्रशांत नाईक यांनी त्यांच्या संस्थेची कामकाजाची माहिती सांगितली.या अभ्यास दौऱ्यामध्ये गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रिय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची सदिच्छा भेटीसाठी अरूण नाईक यांनी सहकार्य केले त्याबद्दल सेकंडरी पतसंस्थेच्या वतीने त्यांच्या सन्मान करण्यात आला.अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव किशोर पाटील,सहसचिव सतीश माने,खजिनदार सतेश शिंदे,संचालक जगन्नाथ जाधव,पांडुरंग कणसे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व संचालक सचिन नलवडे,प्रमोद देशमुख, तुकाराम बेनके,गोविंदराव सुळ,इ.संचालक मंडळ व सभासद सचिन पाटील,आण्णा खर्जे अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होते.